जम्मू काश्मीरमध्ये आज बराच बदल झाला आहे. याआधी, पाकिस्तानधार्जिणी मते व्यक्त करणे नित्यनियमाचे होते. जम्मू काश्मीर स्वातंत्र्याच्या बाता तिथे मारल्या जात. पण नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आणि ३७० कलम हटविल्यापासून तिथे जनमानस बदलले आहे. एका युट्यूब चॅनेलच्या पत्रकाराने तिथल्या स्थानिक गरीब रहिवाशांना बदललेल्या परिस्थितीबद्दल विचारले तेव्हा नरेंद्र मोदी सरकारने आम्हाला खूप मदत केली आहे, आम्हाला मिळत असलेल्या सरकारी योजनांमुळे आमचे जीवन काहीप्रमाणात दिलासादायक झाले आहे, असे ते म्हणतात.
या पत्रकाराने दोन वृद्ध मुस्लिम रहिवाशांना विचारले की, मोदी सरकारबद्दल तुमचे काय मत आहे, त्यावर ते म्हणतात, सरकारकडून पेन्शन मिळते, रेशन मोफत मिळते. दरमहिना २ हजार रक्कम मिळते. ६ हजार रुपयेही मिळतात. कुणीही मोदींच्या ताकदीचा नेता सध्या नाही. मोदींनी जे काम केले तसे कुणीही केलेले नाही. आम्ही सीमारेषेच्या परिसरात राहतो. आम्हाला मजुरी मिळत नाही, हाताला काम नसते. पण मोदींच्या योजनेचा आधार आहे.
"Modi is a kafir, you voted for him hence you're also a Kafir"
Just notice how they have stopped hesitating from speaking such things openly…pic.twitter.com/C4w3lYK7SJ
— Mr Sinha (@MrSinha_) April 15, 2025
ते म्हणतात, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आम्हाला सक्ती करतात की, तुम्ही मोदींना मत का देता? आम्हाला मत द्या. त्यांच्याकडून आम्हाला त्रास दिला जातो. मोदी काफिर आहेत त्यांना का मत देता. जर तुम्ही त्यांना मत देत असाल तर तुम्हीही काफिर आहात, असे आम्हाला हिणवले जाते. पण आम्ही मोदीना, भाजपालाच मत देणार कारण त्यांनी आम्हाला मदत तरी केली आहे.
हे ही वाचा:
धोनीचा नवा शिलेदार मैदानात उतरतोय!
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी १२५ वर्षे जुन्या कराराचा वापर; काय आहे करार?
सेन्सेक्सची १६०० अंकांनी उंच झेप!
या वृद्धांपैकी एकाने म्हटले की, इथे गरिबांना काम नाही. फक्त नॅशनल कॉन्फरसच्या समर्थकांकडून काम मिळते. आम्ही दोघे सीमारेषेजवळ असलेल्या गावातील आहोत. सहा महिने इथे बर्फच असतो. त्यामुळे पोटासाठी काहीही नसते. उत्पन्न नाही. मोदींनी मात्र चांगले काम केले आहे. इथे वासिम बारी म्हणून नेते होते त्यांना मारण्यात आले. फकीर खान साहब त्यांनाही मारण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आमचे ऐकणारा असा इथे कुणीही नाही. त्यामुळे मोदींचा आम्हाला आधार आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या शेख अब्दुल्लांनी इथे काय काम केले. काहीही केलेले नाही. २०१९नंतर इथले वातावरण बदलले आहे. म्हणून भाजपासोबत जाणाऱ्यांना धमकावले जाते.