अन्य धर्माबद्दल बोलले असते तर आव्हाड जिवंत तरी राहिले असते का?

जितेंद्र आव्हाडांच्या व्यक्तव्यावर नितेश राणेंचं टीकास्त्र

अन्य धर्माबद्दल बोलले असते तर आव्हाड जिवंत तरी राहिले असते का?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री राम यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने राज्यभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे.एकीकडे अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.देशभरात आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याने प्रभू राम यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याने सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.दरम्यान, भाजप आमदार नितेश राणेंनी देखील जितेंद्र आव्हाडांवर टीका केली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, बहुजनांचा राम आहे. राम शाहकारी नव्हते, मांसाहारी होते, असं वक्तव्य त्यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यानंतर भाजपा आक्रमक झाली असून अनेक नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांना खडेबोल सुनावले आहेत.भाजप आमदार नितेश यांनी ट्विटरवर व्हिडिओ अपलोड करत टीका केली.

हे ही वाचा:

श्रमजीवी बॉम्बस्फोट प्रकरणात दोघांना फाशी

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला ७० कोटी डॉलरची मदत?

न्यूजर्सीमधील मशिदीबाहेरील गोळीबारात इमामाचा मृत्यू

इराणमधील स्फोटात १०३ जणांचा मृत्यू

नितेश राणे म्हणाले की, सकल हिंदू समाज म्हणून आपण अजून किती सहन करायच.याबद्दल आपण कधीतरी विचार करणार आहोत का? जो अपमान प्रभू श्री रामांचा मुंब्राच्या जिदुद्दीनने केला आहे. तोच अपमान अन्य कोणत्याही धर्माच्या, धर्म गुरूंचा अपमान केला असता तर तो आज जिवंत तरी राहिला असता का?

नुपूर शर्मा यांनी वक्तव्य केल्यानंतर आज ते आपल्या स्वतःच्या देशामध्ये मोकळे फिरू शकत नाहीत.सगळे इस्लाम राष्ट्र एकत्र येऊन आपल्या भारत सरकारला पत्र लिहून नुपूर शर्मा यांना इशारा दिला होता.आणि आपल्या देवी-देवतांबद्दल कोणी काहीही जाहीर वक्तव्य करतात.किती हिम्मत करतात, सनातन धर्माला आव्हान देतात. तरीही आपण फक्त सहन करत बसायचं. फक्त निषेध व्यक्त करत बसायचं.याबद्दल सकल हिंदू समाजाला आता विचार करण्याची वेळ आली आहे.

 

 

Exit mobile version