आम्ही हिंदूनो एक व्हा, म्हटलं असतं तर…

आम्ही हिंदूनो एक व्हा, म्हटलं असतं तर…

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत असतानाच कुचबेहार येथील प्रचारसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. “ममता बॅनर्जी मुस्लिम व्होटबँकेच्या नावावर मते मागत असल्याचं आरोप करतानाच आम्ही हिंदूनो एक व्हा म्हटलं असतं तर निवडणूक आयोगाने आतापर्यंत आम्हाला नोटीस पाठवली असती”, अशी टीका मोदींनी केली आहे.

ममता बॅनर्जी उघडपणे मुस्लिमांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. त्यांना एकत्र येण्याचं आवाहन करत आहे. खरे तर त्यांच्या हातून मुस्लिम व्होटबँक निघून गेल्याचंच दिसत आहे. ममता बॅनर्जींनी मुस्लिमांना मतदान करण्यासाठी एकजूट होण्याचं आवाहन करूनही त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली नाही. जर आम्ही हिंदूंना एकजूट होऊन भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केलं असतं तर आतापर्यंत आम्हाला निवडणूक आयोगाची नोटीस आली असती, असा आरोप मोदींनी केला आहे.

हे ही वाचा:

अमित शाह, योगी आदित्यनाथ लष्कर-ए-तोयबाच्या हिट लिस्टवर

महाराष्ट्रावर कोरोनाचे सावट गडद

सचिन वाझेचा पुन्हा एकदा सीएसएमटी- कळवा प्रवास

तिसरी विकेट कोणाची?

ममतादीदी आता ईव्हीएमलाही शिव्या घालत आहेत. परंतु तुम्ही त्याच ईव्हीएममुळे जिंकला होतात. तेव्हा काही वाटलं नव्हतं. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होत आहे. ती म्हणजे तुम्ही निवडणूक हरलेल्या आहात. पैसे देऊन लोक भाजपाच्या रॅलीत येत असल्याचा आरोप दीदी करत आहेत. खरे तर दीदी बंगालच्या जनतेचा अपमान करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. दीदींना टिळा लावणाऱ्यांचा, भगवा परिधान करणाऱ्यांचा तिरस्कार आहे. असंही ते म्हणाले.

येत्या २ मे रोजी बंगालमध्ये भाजपाचं सरकार स्थापन होईल. त्यानंतर विकासाला सुरुवात होईल. बंगालमधून दीदींचा पराभव निश्चित आहे. पहिल्या दोन टप्प्यात आणि आता तिसऱ्या टप्प्यातही भाजपाचीच लाट दिसत आहे, असंही ते म्हणाले.

Exit mobile version