पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी रामटेक येथे जनतेला संबोधित केले.यावेळी पंतप्रधानांनी इंडी आघाडीवाल्यांवर जोरदार टीका केली.पंतप्रधान मोदी म्हणाले की, गरीब पुढे जात असेल तर ह्या इंडी आघाडीवाल्यांना कधीही बघवणार नाही.मराठी मध्ये एक म्हण आहे, ”काठी मारल्याने पाणी कधीही दुभंगत नाही”. हे मोदींवर कितीही मारा करोत, देशाच्या सेवेच्या संकल्पनेतून मोदी कधीही पाठी फिरणार नाही.जर इंडी आघाडीवाल्यांची ताकद वाढली तर देशाचे तुकडे-तुकडे करतील, अशी टीका पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केली.
पंत्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रभू श्री राम चंद्राच्या पावन भूमीमध्ये, आणि श्री रघुजी भोसले महाराजांच्या, शौर्याचा वारसा लाभलेला या रामटेकच्या पावनभूमीला माझा साष्टांग नमस्कार. संध्याकाळची वेळ सुरु झाली आहे मात्र तुमचा उत्साह बघून असे वाटत आहे की, दिवसाची सुरुवात आता झाली आहे.मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं.
ते पुढे म्हणाले, १९ तारखेला आपल्याला केवळ एक खासदार निवडायचा नाही तर, आपल्याला पुढील येणाऱ्या एक हजार वर्षांच्या भारताच्या खोडाला मजबूत करण्यासाठी मतदान करायचे आहे.विकसित भारताच्या संकल्पनेसाठी आपल्याला मतदान करायचे आहे.लोकसभा निवडणुकीला सामोरे ठेवून आजकाल मीडियावाले, टीव्ही वाले वारंवार सर्वे दाखवत आहेत.या सर्वेमधून एनडीएचा बंपर विजय दिसत आहे.परंतु मी आज मीडियावाल्यांची मदत करणार आहे.या सर्वे मार्गे मिडयावाले इतका खर्च कशाला करत आहेत.
मीडियावाल्याना मी एक फॉर्मुला देणार आहे, ज्याने यांचे पैसे वाचतील.जेव्हा मोदीला शिव्या देणाऱ्या संख्या वाढतील तेव्हा समजून जा की पुन्हा एकदा, जेव्हा हे लोक माझ्या स्वर्गीय आई, वडील यांना शिव्या देतील तेव्हा समजून जा की, पुन्हा एकदा, जेव्हा ईव्हीएमवर प्रश्न उठतील तेव्हा समजून जा की पुन्हा एकदा.. आणि जनतेतून एकच आवाज मोदी सरकार.
हे ही वाचा:
ओवेसिंच्या विरोधात कॉंग्रेस उमेदवार देणार नाही
परगाणा भागात इस्लामवाद्यांचा हिंदुंवर हल्ला
रश्मी बर्वेंना दणका; जात पडताळणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची १०वी यादी आली समोर!
मोदी जर तिसऱ्यांदा आला तर लोकतंत्र आणि संविधान संपुष्टात येईल, अशी अफवा आजकाल इंडी आघाडीवाले आणि त्यांचे लोक पसरवत आहेत.नितीन गडकरी यांनी चांगलंच याला उत्तर दिल आहे.मी जेव्हापासून राजकारणात आलो आहे तेव्हा पासून एकही अशी निडवणूक गेली नाही ज्यामध्ये विरोधकांनी अशा बेताल कथा सुनावल्या नसतील.अटल वाजपेयी यांची सरकार बनली तेव्हा सुद्धा अशाच गोष्टी बोलते होते.याचा अर्थ यांची बँक करप्सी इतकी आहे की यांच्याकडे दुसरी आयडिया देखील नाही आहे.इमर्जन्सीच्या काळात लोकतंत्र संपुष्टता नव्हते ?, पूर्व पासून पश्चिम आणि उत्तर पासून दक्षिण पर्यंत या लोकांच्या परिवाराचा सरकारचा एक प्रकाराचा कब्जा होता.चारही बाजू तेच दिसत होते, तेव्हा लोकतंत्र संपुष्टात येत न्हवते?.
जेव्हा एका गरीबाचा मुलगा जसा देशाचा पंतप्रधान बनला तेव्हा लगेच यांना लोकतंत्र आणि देशाचा संविधान संपुष्टात दिसू लागले.गरीब पुढे जात असेल तर ह्या इंडी आघाडीवाल्याना कधीही बघवणार नाही.मराठी मध्ये एक म्हण आहे, ”काठी मारल्याने पाणी कधीही दुभंगत नाही”. हे मोदींवर कितीही मारा करोत, देशाच्या सेवेच्या संकल्पनेतून
मोदी कधीही पाठी फिरणार नाही.
इंडी आघाडीवाले पूर्ण ताकदीने लोकांना वेगळे करण्यात गुंतले आहेत.त्यांना माहिती आहे की जर देशातील लोक एकत्र झाले तर इंडी आघाडीचा राजनीती संपून जाईल.त्यामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेने एकजूट होऊन देशाच्या नावावर मत द्या.इंडी आघाडीवाले जर ताकदवर झाले तर देशाचे तुकडे तुकडे करतील.आजही हे लोक दोन समाजात भांडण लावण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत.भारताच्या संस्कृतीला निशाणा बनवण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाहीत.
यावेळी रामनवमीला प्रभू राम टेंटमध्ये नाहीतर मंदिरामध्ये दर्शन देणार आहेत.५०० वर्षा नंतर हा योग येत आहे.त्यामुळे, रामटेक, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला आनंद होत आहे.पण हे विसरू नका जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा आला तेव्हा ह्या इंडी आघाडीवाल्यानी यावरही बहिष्कार टाकला.निमंत्रण फेटाळून लावले.ही लोकं सनातन वर हमला करतात.सनातनला संपून टाकणाची शपथ घेणाऱ्यासोबत हे रॅली काढतात.नवरात्रीचा पर्व आहे, शक्तीच्या उपासनेचा पर्व आहे.हे लोक हिंदू धर्मातील शक्तीला समाप्त करण्याची भाषा करत आहेत.तुम्ही मला एक सांगा या अशा इंडी आघाडीवाल्याना महाराष्ट्रात एकही सीट जिंकून द्याल का?, त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा व्हायला पाहिजे की नको?, या निवडणुकीत त्यांना मत देऊन शिक्षा द्याल की नाही?.भाजप, शिवसेना , राष्ट्रवादी आज तुमच्याजवळ आली आहे.तुमचे एक एक मत ह्यांना निवडून तर देईलच आणि त्यांना (विरोधकांना) शिक्षा देण्यासाठीही आहे.
काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर मागासवर्गीयांना मागे ठेवले.बाबासाहेब आंबेडकरांच्या राजनीतीला यांनी संपवून टाकले.बाबासाहेब यांना भारतरत्न मिळवल्यापासून वंचित ठेवले.जेव्हा भाजपचे केंद्रात सरकार आहे तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला.२०१४ मध्ये एनडीएची सरकार बनली तेव्हा एका दलित आईचा मुलगा देशाचा राष्ट्रपती बनला.२०१९ मध्ये पुन्हा एनडीएची सरकार बनली तेव्हा पुन्हा एकदा आदिवासी आईची मुलगी राष्ट्रपती बनली.आमच्या सरकारच्या काळात खूप कामे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तसेच सबका साथ, सबका विकास ही संविधानाची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.परिवार वादी पक्षांनी नेहमी या संविधान भावनेचा अनादर केला.आपल्याच परिवाराला पुढे नेण्याचे काम करत गेल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर चांगलीच टीका केली.