आज लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपचा या राज्यांत निर्विवाद विजय

आज लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपचा या राज्यांत निर्विवाद विजय

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची एनडीए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी जय्यत तयारीला लागली आहे. त्यामुळे जनमत कोणत्या आघाडीच्या बाजूने आहे, यासाठी नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. ‘इंडिया टीव्ही’ आणि ‘सीएनएक्स प्रोजेक्ट’ य़ांनी मिळून हरियाणा, दिल्ली आणि पंजाबमध्ये मतदारांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्वेक्षणानुसार, दिल्ली आणि हरियाणामध्ये भाजप आघाडीवर आहे. तर, दिल्लीतील लोकसभेची एकही जागा काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला मिळणार नाही, असे आढळून आले आहे.

सर्वेक्षणानुसार, दिल्लीतील सर्व सात लोकसभा जागांवर भाजपला विजय मिळेल. म्हणजेच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला एकही जागा मिळणार नाही. जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपला दिल्लीत ५२ टक्के मते मिळतील तर, काँग्रेसला अनुक्रमे २५ व १७ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजप आणि सुखबीरसिंग बादल यांच्या नेतृत्वाखालील शिरोमणी अकाली दलाला प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

ऑनलाईन गेमिंग ऍप प्रकरणी बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे ‘शतक’

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

हरयाणामध्ये आता लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपला आठ तर काँग्रेसला दोन जागा मिळण्याचा कयास आहे. तर, हरियाणामध्ये भाजपला ५० टक्के आणि काँग्रेसला ३५ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार, हिमाचल प्रदेशात भाजपला लोकसभेच्या तीन जागा तर, काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपला ४८ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला ४१ टक्के मते मिळू शकतात. मध्य प्रदेशमध्ये भाजपला लोकसभेच्या २५ जागा मिळू शकतात. तर, काँग्रेस चार जागा मिळवू शकते. समाजवादी पक्षाला मध्य प्रदेशात किती मतटक्का मिळेल आणि किती जागा मिळतील, याचा उल्लेख सर्वेक्षणात नाही.

Exit mobile version