लोकसभेच्या प्रचाराकरिता यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते.सांगलीमध्ये भाजप खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ योगी यांची सभा पार पडली.यावेळी सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगींनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.ते म्हणाले की, देशावर जेव्हा संकट येते तेव्हा राहुल गांधी पहिला देश सोडून इटलीला पळून जातात.माझे तर मत आहे राहुल गांधी यांनी इटलीमधून निवडणूक लढावी भारतात त्यांनी आपला वेळ वाया घालवू नये.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, भारतासाठी महाराष्ट्राने खूप काही दिले आहे.जेव्हा महाराष्ट्राचा उल्लेख केला जातो तेव्हा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरण प्रत्येक भारतवासी करतो.लोकनायक म्हटले की, आम्हाला बाळगंगाधर टिळक यांची आठवण येते.सामाजिक न्यायाचा उल्लेख होतो तेव्हा छत्रपती शाहू महाराज यांची आठवण होते.एक राष्ट्राच्या प्रकल्पनेला साकार करण्यासाठी पुढे सरसावलेला महाराष्ट्रातील पेशवा बाजीराव आमच्या समोर येतो.
ते पुढे म्हणाले की, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही बदलत्या भारताला पाहिले आहे.२०१४ च्या पूर्वीच्या भारताचा विचार केला तर जगामध्ये भारताचा सम्मान ढासळत चालला होता, देशाच्या सीमा संरक्षित नव्हत्या, आतंकवादाचे प्रमाण वाढले होते, नक्षलवादाचे प्रमाण वाढत चालले होते, देशात शेतकरी, व्यापारी, महिला सुरक्षित नव्हता.मात्र, २०१४ च्या मोदींच्या आगमनाने देशातील १४० कोटी लोकांचा जगभरात सम्मान वाढला आहे.देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या, नक्षलवाद, आतंकवाद संपला आहे. आता आमच्या देशात कोठेही फटाका फुटतो तेव्हा पाकिस्तान पहिलाच हात वर करून सांगतो आमचा यामध्ये हात नाहीये.कारण त्याला माहित आहे की हा नवा भारत आहेत. कोणाला छेडत नाही मात्र, जर कोणी छेडायचा प्रयत्न केला तर त्याला सोडतंही नाही.हा मोदींचा भारत आहे, असे योगी म्हणाले.
हे ही वाचा:
सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरली!
सिद्धू मूसवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या?
कोव्हीशिल्ड लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची चर्चा, पण तथ्य नाही
टीएमसीला मतदान करण्यापेक्षा भाजपला करा!
ते पुढे म्हणाले की, आज शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी, कामगारांसाठी अनेक योजना आहेत.काँग्रेसवर टीका करताना योगी म्हणाले की, राहुल गांधीला सुद्धा तुम्ही पाहिले आहे.जेव्हा देशासमोर संकटे आली, कोरोनाचं संकट जेव्हा आले, कोणतीही आपत्ती आली तेव्हा राहुल गांधी पहिला देश सोडून पळून जातात.कोरोनाच्या संकटावेळी ते इटलीला पळून गेले होते.मी त्यांना सांगेन की, इटलीमधूनच त्याची निवडणूक लढवावी या ठिकाणी कशाला तुमचा वेळ वाया घालवता?.
पंतप्रधान मोदींच्या कामाचा त्यांनी उल्लेख केला.गरिबांसाठी, महिलांसाठी अनेक योजना राबवल्या. हे सर्व मोदींनी केवळ १० वर्षात केलं आहे.कोणाची जात, धर्म, चेहरा पाहून हे सर्व मोदींनी केलं नाही.कारण मोदींचा एकच मंत्र होता, ‘सबका साथ सबका विकास’मोदींच्या नेतृत्वाखाली गडकरींनी अनेक हायवे बांधले. आज देशात दुप्पट हायवे झाले आहेत. आधी पाच शहरांमध्ये मेट्रो धावत होती, आज २० शहरांमध्ये मेट्रो धावत आहे. काँग्रेसने राम मंदिराची उभारणी का केली नाही?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस गो हत्या खुलेपणाने करू इच्छित आहे, हे मोठे पाप काँगेस करत आहे. काँग्रेस आता खोटं बोलता येईल तितके बोलत आहे, कारण या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहासजमा होईल अशी त्यांनी भीती आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याचे धाडस करत नाही. जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेस विभाजन करण्याचा डाव आखत आहे. जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची घोषणा करून काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यास जाती जातीत विभाजन करण्याचे काम करेल, असे योगी म्हणाले.