राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. त्यांच्या छातीत दुखू लागले होते आणि अशावेळी तातडीने त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती. एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळताच त्यांनी फोन फिरवून तातडीने आवश्यक ती व्यवस्था केली होती. एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी होते मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून त्यानू तातडीने मदत पाठवून दिली होती.
दरम्यान, एकनात खडसे यांची प्रकृती सुधारली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करत त्यांना जी मदत केली त्याबद्दल आभार मानले आहेत. यावेळी एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांशी भावनिक संवाद साधला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
“आपला छोटाच विषय होता. आपल्या दृष्टीकोनातून बहुदा फार मोठाही नव्हता. मला एअर ऍम्ब्युलन्स मिळत नव्हती. एक मिळाली ती नाशिकला उभीही होती. मात्र, एटीसी क्लिअरन्स मिळत नव्हता. तुम्ही बोलल्यामुळे मिळालं. मी रुग्णालयात आलो. ऑपरेशन थिएटरमध्ये मला नेलं तेव्हा ऍन्जिओप्लास्टीचा निर्णय घेतला. दोन ब्लॉकेज १०० टक्के आणि तिसरा ७० टक्के होता. परिस्थिती गंभीर होती. पण त्यांनी ऍन्जिओप्लास्टी केली. ती व्यवस्थित पार पडली. कार्डिअॅक अरेस्ट आला.. माझं हृदय १०० टक्के बंद पडलं. त्यावेळी दोन मिनिटांची शॉक ट्रिटमेंट दिली. तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेक ऑफ झालं असतं आणि लँड झालंच नसतं. तुमचे आभार. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा!” असं एकनाथ खडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोनवर म्हणाले.
हे ही वाचा:
गाड्यांच्या नोंदणीत १७ टक्क्यांनी तर दुचाकींच्या १२ टक्क्यांनी वाढ
उत्तर प्रदेशात चार हात- चार पायाच्या मुलाचा जन्म
कंत्राटी कामगारांना दिवाळी भेट; ५८० सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याचा आदेश
बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून दुसरे समन्स
एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातल्या दरे गावात होते. दरम्यान, एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकनाथ खडसेंसाठी एअर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था केली. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्याशी संपर्क केला होता. त्यानंतर तातडीने एअर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याबाबत आता एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.