29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणआरोपीने पोलिसांवर गोळी झाडली तर आमचे पोलीस टाळ्या वाजवणार का?

आरोपीने पोलिसांवर गोळी झाडली तर आमचे पोलीस टाळ्या वाजवणार का?

पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळीबार केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अधोरेखित

Google News Follow

Related

आम्ही चकमकींवर विश्वास ठेवत नाही; पण जर आरोपीने पोलिसांवर गोळी झाडली तर आमचे पोलीस टाळ्या वाजवणार का? असा सवाल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. ‘इंडिया टुडे’च्या कॉनक्लेव्हमध्ये बोलत असताना त्यांनी बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटर मुद्द्यावर भाष्य केले. पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळीबार केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही चकमकींवर विश्वास ठेवत नाही. मी वैयक्तिकरित्या असे मानतो की कायद्याचे नियम पाळले गेले पाहिजेत आणि त्यानुसार, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा त्वरित झाली पाहिजे. हल्ला झाला तर आमचे पोलीस टाळ्या वाजवणार नाहीत आणि स्वरक्षण म्हणून त्यांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. पुढे ते असेही म्हणाले की, अशा घटनांचा गौरव केला जाऊ नये आणि याची निष्पक्ष चौकशी केली जाईल.

बदलापूर प्रकरणातील एन्काऊंटरनंतर मुंबईत विविध ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. त्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी अशा होर्डिंग्जला आणि आरोपीच्या गोळीबारानंतरच्या उत्साहाचे समर्थन करत नाही. या घटनेची राज्य सीआयडी निष्पक्ष चौकशी करेल.

हे ही वाचा..

हिमाचलचे मंत्री विक्रमादित्यांना काँग्रेसने फटकारले

संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन मंजूर

मुलाच्या अंत्यविधीसाठी सुरक्षा द्या! मृत अक्षय शिंदेच्या कुटुंबाचे शाह आणि फडणवीसांना पत्र!

झाशीच्या राणीच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या वक्फ बोर्डाचा प्रयत्न हाणून पाडला!

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून महायुतीचे सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याचे उत्तर देण्याची क्षमता माझ्यात नाही. अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडू शकतात पण मी महाराष्ट्र भाजपचा नेता आहे. त्यामुळे आमच्या पक्षात मुख्यमंत्री कोण होणार हे संसदीय मंडळ ठरवते, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीबद्दलचे मत मांडले. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल आणि महायुती आघाडी पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांना प्रयत्न करायचे असल्यास त्यांनी करावेत पण जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद आहे तोपर्यंत ते मला हटवू शकणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसा तोडायचा हे मला माहीत आहे, असेही ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा