‘राहुल गांधी यांच्या यात्रेआधी जागावाटप करा, अन्यथा…’

अखिलेश यादव यांनी काँग्रेससमोर ठेवली अट

‘राहुल गांधी यांच्या यात्रेआधी जागावाटप करा, अन्यथा…’

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला असता, ‘इंडिया गटाचे जागावाटप झाले तर यात्रेमध्य सहभागी होऊ’ असे उत्तर त्यांनी दिले. अखिलेश यादव शनिवारी बलियामध्ये होते.

‘ज्या प्रकारे राहुल गांधी येथे न्याय यात्रा घेऊन येत आहेत, तुम्हाला काय वाटते ही काँग्रेसची यात्रा आहे की, इंडिया गटाची यात्रा आहे’, असे विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी सडेतोड उत्तर दिले. ‘उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांची यात्रा पोहोचण्याआधी जागावाटप झाले तर मीही यात्रेत सहभागी झाल्याचे दिसेल. मात्र जागावाटप न झाल्यास समाजवादी पक्ष तिथे दिसणार नाही.

हे ही वाचा:

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोएल म्हणतात, आता तुरुंगातच मेलो तर बरे’!

मालदीवच्या नेत्याने केलेल्या भारताच्या अपमानानंतर बायकॉट मालदीव ट्रेंडमध्ये

बांगलादेशच्या हसीना म्हणतात, भारत हा विश्वासू मित्र!

अयोध्येत जमिनींना चढला भाव; किंमती चारपट वाढल्या

सर्वजण विशेषतः सर्व उमेदवार सर्व सामर्थ्यानिशी त्यांच्यासोबत यात्रेत दिसतील. म्हणजे आता तर ही काँग्रेसची यात्रा आहे. मात्र मला आशा आहे की, जेवढे विरोधी पक्ष आहेत, जे काँग्रेस पक्षासोबत आघाडी करून लढू इच्छितात, यात्रेआधी या सर्वांमध्ये जागावाटप होईल. त्यामुळे हा लढा आणखी सामर्थ्यानिशी लढला जाऊ शकतो,’ असे अखिलेश यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘यात्रा होणे हे चांगलेच झाले. मात्र इंडिया गटातील सर्व घटकपक्षांना जागावाटप लवकर हवे हवे. जागावापट झाल्यास आपोआपच अनेकजण यात्रेत सहभागी होतील. जो उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक असेल, तो संपूर्ण जबाबदारीने येथे उभा राहिलेला दिसेल,’ असेही अखिलेश यांनी सांगितले.

Exit mobile version