‘नवाब मलिक कॅबिनेट मंत्री असतील तर अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ देणार नाही’

‘नवाब मलिक कॅबिनेट मंत्री असतील तर अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ देणार नाही’

मनी लाँड्रिंगचा गंभीर आरोप असलेल्या नवाब मलिक यांनी कॅबिनेट मंत्रीपदी कायम राहिल्यास आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही, असे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज इशारा दिला आहे.

माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, ” कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात मलिकांना ईडीने अटक केले आहे. मात्र अटक असले तरी महाराष्ट्र सरकारने अद्याप त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतलेला नाही. मलिक कॅबिनेट मंत्री म्हणून कायम राहिल्यास भाजपा सभागृहाचे कामकाज करू देणार नाही. ”

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होणार असून २५ मार्चपर्यंत चालणार आहे. फरारी डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने गेल्या आठवड्यात मलिकला अटक केली होती. त्यामुळे हे प्रकरण यंदाच्या धिवेशनात चांगलेच गाजणार आहे.

दरम्यान, माजी मंत्री संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याआधीच त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता, याकडे भाजपाने लक्ष वेधले आहे. यावर पाटील म्हणाले की, ” राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांनी मलिक यांच्या अटकेला राजकीय सूडभावना असल्याचे म्हटले आहे. मात्र या म्हणण्याला त्यांनी कोणताही ठोस आधार दिलेला नाही. ”

हे ही वाचा:

‘मविआ सरकार राज्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार’

ॲपलने रशियामध्ये उत्पादनांची विक्री थांबविली, इतर सेवाही केल्या मर्यादित

आर्यन खानला क्लीन चिट हा PR चा फंडा

लोकांच्या मूलभूत अधिकाराचे काय? उच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला सवाल

माविआ नेत्यांचे म्हणणे की हा कथित गुन्हा तीस वर्षांपूर्वी घडला होता. याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणले की, ” जेव्हा आमचे महाराष्ट्रात सरकार होते तेव्हा आम्हाला याबाबत कल्पना असती तर आम्ही नक्कीच त्यावर कारवाई केली असती. मलिक यांच्यावरील आरोपांमध्ये अशा व्यक्तींचा समावेश आहे ज्यांचे या देशाविरुद्धचे गुन्हे यापूर्वीच सिद्ध झाले आहेत. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रयत्नशील आहेत.”

Exit mobile version