23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणमुंबई मॉडेल इतकेच यशस्वी होते तर लॉकडाऊन का वाढवला?

मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी होते तर लॉकडाऊन का वाढवला?

Google News Follow

Related

ठाकरे सरकारकडून गाजावाजा केले जाणारे मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी असेल तर लॉकडाऊन ३१ मे पर्यंत का वाढवण्यात आला, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकार कोरोनाचे खरे आकडे लपवत आहे. त्यांना राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव आहे. बेडस आणि ऑक्सिजनचा अजूनही तुटवडा आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये लॉकडाऊन हटवण्याची हिंमत नाही. अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

ठाकरे सरकार कोरोनाची खरी परिस्थिती लपवण्यासाठी आणि आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी बॉलिवूड कलाकारांकडून ट्विट करवून घेते. त्यासाठी शिवसेना भवनावरून अनेक कलाकारांना फोन केले जातात, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला.

नितेश राणे यांनी गुरुवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केले. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडिया अकाऊंटस सांभाळण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. तसेच ठाकरे सरकारने आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिले आहे. ही एजन्सी दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. तुम्ही करिना कपूर किंवा कतरिना कैफ यांची अलीकडची ट्विटस बघा. या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पैसे देऊन ट्विट करवून घेतले जात आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले.

आगामी अधिवेशनात मी हे सर्व पुरावे मांडून सर्वांना उघडं पाडणार आहे. कोणाला आतापर्यंत किती पैसे देण्यात आलेत, किती बिलं झालेत, हे सर्व मला माहिती आहे. छोट्या कलाकारांना ट्विट करण्यासाठी साधारण तीन लाख आणि बड्या कलाकारांना त्यापेक्षाही जास्त रक्कम मिळते. त्यासाठी थेट सेनाभवनातून या बॉलिवूड सेलिब्रिटींना फोन केले जातात, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

हे ही वाचा:

लसीकरणासाठी पैसा नाही म्हणणारे सोशल मिडियासाठी सहा कोटी खर्च करतायत

महाराष्ट्रात १ जूनपर्यंत ‘कडक निर्बंध’

भारताने इस्रायलविरोधी भूमिका घ्यावी-काँग्रेस

महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, पीआर आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या खरोखरच कमी झाली असती तर अनलॉक झाले पाहिजे होते. दुकाने आणि इतर व्यवहार सुरु करायला परवानगी दिली पाहिजे होती. पावसाळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मग उरलेल्या १५ दिवसांत लोकांना पैसे कमवू द्यायचे होते. मात्र, मुळातच मुंबई मॉडेल फसवे असल्यामुळे ठाकरे सरकारने लॉकडाऊन वाढवल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा