“महिला सुरक्षेच्या प्रश्नावर दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा.” अशी मागणी करत भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
— nitesh rane (@NiteshNRane) September 11, 2021
“महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत. पुणे असो, मुंबई असो, अमरावती असो, ज्या पद्धतीने गुन्हेगारांची हिम्मत वाढत्येय याचं मुख्य कारणच आहे की जर राज्याचे मंत्री आणि सत्ताधारी नेतेच महिलांवर अत्याचार करून जर राजरोसपणे फिरत असतील, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसेल तर मग या गुन्हेगारांना तर खुलं मैदानच मिळालेलं आहे. एका बाजूला दिशा सालियानचं प्रकरण असो, पूजा चव्हाणचं प्रकरण असो, करुणा मुंडेंचं प्रकरण असो, किंवा राष्ट्रवादीचे युवक अध्यक्षाचं प्रकरण असो, सगळ्या बाबतीमध्ये सत्ताधारी नेते मंडळी आणि मंत्रीच महिलांवर अत्याचार करत असतील तर मग गुन्हेगारांना थांबवणार कोण? पोलीस खातं जर नेते मंडळींना वाचवण्यासाठीच वापरलं जात असेल तर या गुन्हेगारांची भितीच संपलेली आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडतायत.” असंही नितेश राणे म्हणाले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा
जेव्हा ‘हम करे सो कायदा’ या चालतो तेव्हा ‘कायद्याचे राज्य’ उरत नाही
कायद्याचा धाक राहिलेला नाही, सरकार केवळ नियमबाह्य बदल्यांमध्ये व्यस्त आहे
साकीनाका बलात्कार पीडितेची झुंज अपयशी
मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार झाला होता. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. राजावाडी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.