राणा दाम्पत्य घराबाहेर पडू नयेत म्हणून त्यांच्या घरात दहा ते बारा पोलीस अधिकारी आहेत. तरीही राणा दाम्पत्य त्यांच्या मतावर ठाम आहेत. नवनीत राणा म्हणाल्या, कितीही अडचणी आल्या तरीही आम्ही मातोश्रीवर जाणार आणि मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची जाणीव करून देत हनुमान चालीसा पठण करणारच. तसेच मुख्यमंत्री म्हणजे बिन कामाचे फुल अधिकारी असल्याची टीका नवनीत राणा यांनी केली आहे. राणा दाम्पत्यांना मातोश्रीवर जाण्यास का अडवले जात आहे, असाही सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा जेव्हा त्यांच्या घराबाहेर आले तेव्हा दरवाजातच त्यांना पोलिसांनी अडवले. त्यावेळीसुद्धा नवनीत राणा यांनी त्या स्वतःच्या मतावर ठाम असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही बोलत नाहीत. राज्यात एवढे विजेचे संकट सुरु आहे त्यावर मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत मात्र राणा दाम्पत्य मातोश्रीवर येणार हे कळताच शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आमच्या इमारतीजवळ येऊन आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही फक्त हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान केले. मात्र शिवसैनिक असे आक्रमक झाले आहेत जसे की, आम्ही काही हल्लाच करणार आहे. मुख्यमंत्री म्हणजे, बिन कामाचे फुल अधिकारी आहेत, असा टोला नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
तसेच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि इतर शिवसैनिक म्हणाले होते मातोश्री हे आमचे मंदिर आहे. त्यावरून नवनीत राणा यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, मंदिरातच जाऊन हनुमान चालीसा पठण करतात, मग हेच शिवसैनिक आम्हला का अडवत आहेत, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
अमित मिश्राची फिरकी, इरफान पठाण क्लीन बोल्ड
गुरु तेग बहादूर शौर्याचा आदर्श ठेवतात; प्रकाशपर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश
‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’
‘टक्केवारी ‘ च्या हव्यासापोटी राज्यात विजेची कृत्रीम टंचाई
राणा दाम्पत्य हे मातोश्रीवर जाण्याच्या मतावर ठाम असल्यामुळे पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. राणा दाम्पत्यांच्या घरात सध्या दहा ते बारा पोलीस असून, त्यांना घराबाहेर जाण्यास रोकले जात आहे.