दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य धोरण घोटाळयाप्रकरणी जामीनावर बाहेर आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना अंतरिम जामीन देण्यात आला होता. मात्र, २ जून रोजी त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातून पळ काढण्यासाठी म्हणून अरविंद केजरीवाल यांची न्यायालयात धावाधाव सुरू आहे. जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्यासाठी केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत त्यांना दणका दिला. परंतु, जामीन मिळावा यासाठी केजरीवालांनी राऊज एव्हेन्यू कोर्टात धाव घेतली होती.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांनी रेग्युलर आणि अंतरिम दोन्ही जामीन याचिका दाखल केल्या आहेत. गुरुवार, ३० मे रोजी न्यायालयात सुनावणी वेळी ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध केला. यावेळी ईडीने भर न्यायालयात प्रश्न उपस्थित केला. जर अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खराब आहे तर ते इतक्या जोशात निवडणुकीचा प्रचार का करत आहेत?
अरविंद केजरीवाल हे पंजाबमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्यांची प्रकृती त्यांना प्रचार करण्यापासून रोखत नाही, हे विशेष. त्यांनी मोठ्या जोशात पक्षाचा प्रचार केला आहे आणि आता अंतिम टप्प्यात जामीन याचिका दाखल केली आहे. परंतु, त्यांच्या वागणुकीनुसार त्यांना जामीन मिळायला नको, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला आहे.
हे ही वाचा:
पदमुक्त असतानाही डॉ. तावरेने ससूनमध्ये रक्त नमुने बदलले
केवढा हा आत्मविश्वास… नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे ठिकाण, तारीखही ठरली!
पुणे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीऐवजी आईचे घेतले रक्तनमुने!
हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा एक दिवस आधीच मान्सूनचे केरळमध्ये आगमन
अरविंद केजरीवाल यांना ईडीने दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. २१ मार्चला अटक केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १० मे रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर अरविंद कजेरीवाल यांनी २ जून रोजी आत्मसमर्पण करावं असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, अंतरिम जामिनाची मुदत संपण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य विषयक तपासणीसाठी सात दिवसांनी वाढवून द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. मात्र, यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दणका मिळाला आहे. यानंतर त्यांनी राऊज एव्हेन्यू कोर्टात धाव घेतली होती.