पुण्यातील मावळ येथे शरद पवारांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप करत शरद पवारांनी आमदार सुनील शेळके यांनाच धमकावले. प्रथमच शरद पवार यांनी अशाप्रकारे आमदाराला इशारा दिल्याचे दिसून आले. शरद पवारांच्या या टीकेला आमदार सुनील शेळके यांनी प्रत्युत्तर देत थेट आव्हान दिले आहे.
मेळाव्याला येऊ नये म्हणूंन कार्यकर्त्याना दमदाटी केल्याचा आरोप करत आमदार सुनील शेळकेंवर शरद पवार यांनी टीका केली.शरद पवार म्हणाले की, सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला? तुझ्या सभेला कोण आलं होतं? पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवं. मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही’, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
हेही वाचा :
रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?
उत्तर प्रदेशात सपाला आणखी एक धक्का बसणार!
रशियाच्या मिसाईलपासून झेलेन्स्की थोडक्यात बचावले
शरद पवारांच्या टीकेवर आमदार सुनिल शेळके यांनी प्रत्युत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले आणि पवारांना आव्हान केलं. आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, शरद पवार यांच्या सभेला जाऊ नये म्हणून, कोणावर दादागिरी केली, कोणाला दम दिला किंवा कोणाला फोनवरून सांगितलं की आपण सभेला जाऊ नको, असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा, अशा एका व्यक्तीने देखील आपल्याला पुराव्यानिशी माहिती द्यावी अन्यथा हे सर्व आरोप खोटे केल्याचे मी राज्यभर सांगणार असल्याचा इशारा आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार यांना दिला.
ते पुढे म्हणाले, मी साहेबांना भेटणार आहे, त्यांनी सांगावं की काय चूक केली, कोणाच्या वाटेल गेलो.मी कार्यकर्त्यांना दम दिला ही माहिती ज्यांनी दिली ती खरी की खोटी दिली हे आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं. साहेबांनी केलेल्या वक्तव्याची मी दखल घेणार. पुढील आठ दिवसात मी दम दिला असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा आणि पुराव्यानिशी माहिती द्यावी, अन्यथा मी राज्यभर सांगणार की मावळ तालुक्यात येऊन साहेबांनी (शरद पवार) माझ्यावर खोटे आरोप केले, असे आमदार सुनिल शेळके म्हणाले.