“बिल्डरांना पाच हजार कोटींची सूट, सामान्यांना का नाही?”

“बिल्डरांना पाच हजार कोटींची सूट, सामान्यांना का नाही?”

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना अनेक मुद्यांवर ठाकरे सरकारला लक्ष्य केले. मुंबईतील बिल्डर्सना दिलेल्या पाच हजार कोटींच्या सवलती बद्दलही त्यांनी सरकारवर हल्ला केला. बिल्डर्सना सूट देता तशी जनतेला का नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

“मुंबईच्या बिल्डरांना पाच हजार कोटींची सूट द्यायला सरकार तयार आहे. माझा याला विरोध नाही. अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे म्हणून आपल्याला ही सूट द्यायची आहे. लोकं वेगवेगळ्या चर्चा करतायत, शिवसेनेला १६० ‘बुके’ मिळाले, कोणाला ८० ‘बुके’ मिळाले, कोणाला २५ ‘बुके’ मिळाले. या चर्चेत मला जायचं नाही. आपण असं समजू की,शुद्ध मानाने तुम्ही ही सूट या ठिकाणी दिली. पण त्यांना जर सूट देता तर सामान्य माणसाला का नाही? शेतकऱ्याला का नाही? वीज बिलाच्या संदर्भात का नाही?” असा हल्ला देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला.

हे ही वाचा:

“सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न”

देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारच्या कोविड-१९ काळातील अनेक भ्रष्टाचारांचा उल्लेख केला. याशिवाय पूजा चव्हाण आणि संजय राठोड प्रकरण, धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा प्रकरण याशिवाय राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेहबूब शेख याच्यावरील बलात्काराचा आरोप या सर्व प्रकरणांवरूनही सरकारला घेरले.

 

Exit mobile version