दिल्लीमध्ये आयएएस अधिकारी संजीव खिरवार आणि त्यांच्या पत्नी आयएएस रिंकू डग्गू हे त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरण्यासाठी म्हणून खेळाडू आणि प्रशिक्षकांना त्यागराज स्टेडियम सोडण्यास भाग पाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. सर्वच स्तरावरून या घटनेवर टीका करण्यात आली होती. या प्रकरणाची दखल आता केंद्रीय मंत्रालयाने घेतली आहे.
हे प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अखत्यारित येणाऱ्या गृहखात्याने या प्रकरणातील आयएएस दाम्पत्याची बदली केली आहे. या प्रकरणातील दिल्ली प्रशासनातील महसूल विभगाचे प्रधान सचिव संजीव खिरवार यांची पोस्टींग लडाखला करण्यात आली असून त्यांची पत्नी रिंकू डग्गू यांची अरुणाचलमध्ये बदली करण्यात आली आहे.
Hours after a news report regarding the misuse of facilities at Thyagraj Stadium by Sanjeev Khirwar & his wife Rinku Dugga, MHA has transferred both the AGMUT cadre IAS officers Sanjeev Khirwar & Rinku Dugga to Ladakh and Arunachal Pradesh from Delhi respectively: MHA order pic.twitter.com/teMHyNPwhw
— ANI (@ANI) May 26, 2022
दिल्ली शहरातील त्यागराज स्टेडियम हे राज्य सरकारच्या मालकीचे असून या स्टेडियमची देखभाल सरकारकडून केली जाते. या मैदानात अनेक खेळाडू सरावासाठी येतात. मात्र या स्टेडियमवर सायंकाळी सात वाजल्यानंतर दिल्ली प्रशासनातील महसूल विभगाचे प्रधान सचिन संजीव खिरवार आपल्या श्वानाला घेऊन फिरायला येतात. त्यामुळे या खेळाडूंना वेळेच्या आधीच म्हणजेच संध्याकाळी सात वाजता खेळ आणि सराव बंद करुन मैदान सोडण्यास भाग पाडण्यात येत होते.
पूर्वी ८ ते ८.३० पर्यंत सराव केला जायचा. पण गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी ७ वाजताच खेळाडू आणि प्रशिक्षकांना मैदानाबाहेर पाठवले जात होते. कारण संजीव खिरवार यांना त्यांच्या श्वानाला मैदानात फिरवायचे असते. यामुळे आमच्या सरावावर परिणाम होतो, अशी व्यथा येथील खेळाडूंनी मांडली होती.
हे ही वाचा:
अभिनेत्री अमरीन भट यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा
मीठ म्हणून आणलेलं ५०० कोटींचे कोकेन जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार भारतातील सगळ्यात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उदघाटन
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर! २० जूनला होणार मतदान
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून केंद्रीय गृहमंत्रालयाने अहवाल मागवला होता. त्यानुसार मुख्य सचिवांनी गुरुवारी संध्याकाळी यासंबंधीचा अहवाल गृहखात्याला सोपवला. त्यानंतर संजीव खिरवार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. . तातडीने हे निर्देश लागू होतील असंही गृहखात्याने जारी केलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे. या कारवाईचे अनेकजणांनी कौतुक केले आहे. या घटनेनंतर आता त्यागराज स्टेडिअमच्या सुरु ठेवण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. आता हे स्टेडिअम रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.