31 C
Mumbai
Friday, November 8, 2024
घरक्राईमनामा'आयएएस जिहाद'चा आरोप खरा?

‘आयएएस जिहाद’चा आरोप खरा?

Google News Follow

Related

कानपूरमधील एका आयएएस अधिकाऱ्याचा धर्मांतराला प्रोत्साहन देण्याचा आणि धर्मांतर समारंभात सहभागी होण्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हिंदू धर्माच्या विरोधात प्रचार करून धर्मांतरण केल्यामुळे ‘आयएएस जिहाद’चा आरोप खरा ठरत असल्याची चिन्ह आहेत.

कानपूरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी इफ्तिखारुद्दीन यांच्यावर हिंदू धर्माच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप आहे. मठ मंदिर समन्वय समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भूपेश अवस्थी यांनी हा आरोप केले आहेत.

अवस्थी यांनी सध्या उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून सेवा करत असलेले मोहम्मद इफ्तीराखुद्दीन यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. क्लिपमध्ये आयएएस अधिकारी कानपूरमध्ये मुसलमानांच्या एका धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे दाखवले आहे.

व्हिडिओमध्ये काही मुसलमान जमिनीवर बसलेले दिसत आहेत, तर एका मौलानाच्या उपस्थितीत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यासह धार्मिक उपदेश करताना दिसत आहे. आयएएस अधिकारी प्रेक्षकांशी बोलताना धर्मांतराविषयी बोलताना दिसत आहे.

हे ही वाचा:

नवजोत सिंह सिद्धू यांची ‘हिट विकेट’

पंजाबमध्ये भाजपाला ‘कॅप्टन’ मिळणार?

९१ वर्षांची सुरे’लता’

योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे, ज्याचे प्रमुख डीजी सीबीसीआयडी जीएल मीणा असतील. एसआयटी आपला अहवाल सात दिवसांच्या आत उत्तर प्रदेश सरकारला सादर करेल, असे गृह विभागाने सांगितले. मात्र, हा व्हिडिओ कधी शूट करण्यात आला हे स्पष्ट झाले नाही. व्हिडिओमध्ये, इफ्तखरुद्दीन इस्लाम स्वीकारण्याच्या फायद्यांबद्दल बोलताना ऐकू येत होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा