‘पक्ष मागितला असता तर दिला असता, वर काय घेऊन जायचं आहे?’

सुप्रिया सुळेंनी पारोळ्यात दाखवली दानत

‘पक्ष मागितला असता तर दिला असता, वर काय घेऊन जायचं आहे?’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या मानभावी बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील दौऱ्यात त्यांनी बंधू अजित पवार यांच्याबद्दल बोलताना आपण किती दिलदार हृदयाच्या आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की, अजितदादांनी मला म्हटले असते की, सुप्रिया मला पक्ष आणि चिन्ह दे तर मी सगळं दिलं असतं. तू मोठा आहेस, तुझा अधिकार आहे, घे तुला पाहिजे ते असं मी उत्तर दिलं असतं. वरती काय घेऊन जायचं आहे?

सुप्रिया सुळे त्याच भाषणात आपली कशी द्विधा मनस्थिती झाली याबद्दल म्हणाल्या की, भाऊ मला म्हणाला की माझ्यासोबत चल तर मी त्याला म्हटले की, नैतिकतेची लढाई आहे. म्हणून मी ८० वर्षांच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले. मी कधीही दिल्लीसमोर मुजरा करणार नाही. कष्टाने केलेली अर्धी भाकर खाईन.

हे ही वाचा:

खेडगल्लीचा विघ्नहर्ता नाबाद ७५

सुप्रिया सुळेंचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत असल्यास राज्य सरकार ‘लाडकी बहीण योजने’चे १५०० रुपये देईल !

राजस्थान: उदयपूरमध्ये हिंसाचारानंतर नागरी सुरक्षा संहितेचे कलम 163 लागू; शाळा, इंटरनेट सर्व बंद!

कोल्हापुरातील रुईमध्ये पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू !

त्या असेही म्हणाल्या की, सत्ता स्वतःसाठी नसते. दुसऱ्याच्या आयुष्यात बदल करण्यासआठी असते.

निवडणूक आयोगाने हरयाणाच्या निवडणुकांची घोषणा केली पण महाराष्ट्रातल्या निवडणुकांची घोषणा त्यावेळी केली नाही, त्यावर सुप्रिया सुळे म्हणतात की, वन नेशन वन इलेक्शन असे सरकारचे धोरण असले तरी दोन राज्यांच्याच निवडणुका जाहीर होतात. सरकार निवडणुकीला घाबरले आहे का. निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार नाहीत पण नोव्हेंबरला कदाचित होतील.

 

Exit mobile version