राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत अधिवेशन सुरू असताना मोठा दावा केला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवशेन सुरु असून अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. छगन भुजबळ यांनी त्यांची मराठा आरक्षणावरची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी बोलताना मोठा दावा केला आहे.
“मला गोळी मारली जाईल, असा पोलिसांचा रिपोर्ट आहे,” असा खळबळजनक दावा मंत्री छगन भुजबळ यांनी भर अधिवेशनात केला आहे. यावेळी भुजबळांनी विधानसभेत रिपोर्ट देखील दाखवला. यामुळे महाराष्ट्रच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं असून खळबळ उडाली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, “मला गोळी मारली जाऊ शकते असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. मी आता भुजबळांचा कार्यक्रम करतो, असे जरांगे पाटील म्हणाले. अचानक आपली पोलीस सुरक्षा वाढवली, वरुन इनपूट आहे.” प्रकाश सोळुंखेंचे झाले. संदीप क्षिरसागर यांचे देखील झाले. माझे सुद्धा तसेच होईल, असे छगन भुजबळ म्हणाले.
कालपासून पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याचे कारण विचारले असता, “मला गोळी मारली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. मारा हरकत नाही, पण हे जे सुरु आहे. हे बरोबर नाही मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या पण ही झुंडशाही थांबवा,” असे भुजबळ म्हणाले.
हे ही वाचा:
संसदेवरील हल्ल्याला २२ वर्षे झाली; त्याचदिवशी संसदेत शिरले दोन घुसखोर
संसदेच्या हल्ल्याला २२ वर्ष पूर्ण; पंतप्रधान मोदींनी शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली!
जम्मू काश्मीरमध्ये बांधला जातोय दहशतवाद्यांसाठी भलामोठा तुरुंग
‘तुमच्याकडे किती खलिस्तानी राहतात?’
छगन भुजबळ म्हणाले की, “भुजबळ मराठ्यांचा विरोधक आहे अशी प्रतिमा तयार केली जात आहे. मला सर्वच समाज समान आहे. भुजबळ हा मराठा विरोधक म्हणून प्रतिमा तयार केली जात आहे. मराठा आरक्षणाचा कायदा दोन वेळा आणण्यात आला, त्याला मी पाठिंबा दिला. ओबासी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या असं सर्वजण बोलतात, मात्र मग भुजबळच टार्गेट का?”