“कॅप्टन बदलावर सोळावा गडी बोलत आहे. त्याच्या म्हणण्याला अर्थ नसतो, त्यासाठी टीममध्ये असावं लागतं.” असा षटकार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत एका क्रिकेट सामन्याच्या उदघाटनावेळी पत्रकारांशी बोलताना लगावला. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना युपीएच अध्यक्षपद देण्यात यावं असं सांगितलं होतं. यावरुन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना फटकारले आहे. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी संजय राऊतांचे विधान हास्यास्पद असल्याचे सांगितले आहे.
“सध्याच्या परिस्थितीत मला लूज बॉल मिळत आहेत. त्यांना मला सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते.” अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेटच्या मैदानातून फटकेबाजी केली आहे. वडाळा विधानसभा मतदार संघात आज भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या तर्फे आमदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं होतं. या आमदार चषकाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी फलंदाजी करत काही फटके देखील लगावले. “यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मला हल्ली सर्व लूज बॉल येत आहेत, बॅटिंग करायला मजा येतेय, मी बॉडिलाईन गोलंदाजी करत नाही, योग्य पद्धतीनं खेळतो.”
हे ही वाचा:
संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का?- नाना पटोले
निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा
सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला बॅटिंग करायला मजा येते. लहानपणी मी बॅटिंग-बॉलिंग दोन्ही करायचो. फिल्डिंग कमी करायचो पण ज्यावेळी करायचो त्यावेळी कॅच सुटायचे नाहीत. माझे ठरले आहे की, मी पेस बॉलिंग करणार मी गुगली पण टाकणार आहे, आणि जेंव्हा बॅटिंग येईल, तेव्हा तीही चांगली करेन. मी योग्य बॉल टाकतो.”