निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीचे त्यांचे भाकीत चुकीचे ठरल्याचे मान्य केले आहे. निवडणूकपूर्व मूल्यांकन चुकल्याची कबुली त्यांनी दिली. ‘होय, मी आणि माझ्यासारखे मतदान सर्वेक्षणकार मतदारांना समजून घेण्यात अपयशी ठरलो,’ असे प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत सांगितले.
४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या घोषणेपूर्वी, प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडे टीव्हीवर भाकीत केले की भाजप २०१९च्या निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करेल आणि जवळपास ३०० जागा मिळवेल. तसेच, त्यांनी भाजप विरोधकांवर जोरदार टीका करून ४ जून रोजी भरपूर पाणी प्या, असा सल्ला दिला. तथापि, त्यांचे अंदाज फोल ठरले.
भाजपने लोकसभेच्या २४० जागा जिंकल्या. या जागा सन २०१९च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांपेक्षा २० टक्के कमी होत्या. एनडीएच्या मित्रपक्षांना बहुमत मिळाल्यामुळे युतीचा जादुई आकडा २७२च्या पुढे जाऊ शकला. देशातील भविष्यातील निवडणुकांमध्ये ते संख्याबळाचा अंदाज वर्तवत राहतील का, असे विचारले असता ‘नाही, मी असे करणार नाही. निवडणुकीतील जागांच्या संख्येबाबतचे भाकीत यापुढे मी करणार नाही,’ असे प्रशांत किशोर म्हणाले.
‘मी माझे मूल्यांकन तुमच्यासमोर ठेवले होते आणि मला कॅमेऱ्यासमोर कबूल करावे लागेल की मी केलेले मूल्यांकन तब्बल २० टक्क्यांनी चुकीचे होते. आम्ही म्हणत होतो की भाजप ३००च्या जवळपास जाईल, परंतु त्यांना २४० जागा मिळाल्या. परंतु मी आधी म्हणालो होतो की नरेंद्र मोदींविरोधात जनमानसात थोडासा राग आहे, परंतु व्यापक असंतोष नाही,’ असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.
‘मी असेही म्हटले होते की विरोधकांकडून कोणताही सकारात्मक आवाज आला नाही आणि म्हणूनच पूर्व आणि दक्षिणेकडे काही भौगोलिक विस्ताराने स्थिती निर्माण केली जात आहे. आता स्पष्टपणे, आम्ही चुकीचे सिद्ध झालो आहोत. परंतु जर तुम्ही त्यापलीकडे पाहिलेत तर, ही आकडेवारी चुकीचीही नाही. त्यांना ३६ टक्के मते मिळआली आहेत. जी एकूण मतांचा विचार केल्यास ०.७ टक्क्यांनी कमी आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय, निवडणूक विश्लेषकांनी संख्यात्मक अंदाजात गुंतणे ही चूक असल्याचेही त्यांनी मान्य केले आणि भविष्यातील निवडणुकांमध्ये असे करण्यापासून परावृत्त करण्याचे वचन दिले.
हे ही वाचा:
मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे… मुख्यमंत्री शिंदेंनी वाचली मोदींसाठी खास कविता
संसदेतील घुसखोरीप्रकरणात हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल
‘ईव्हीएम’ जिवंत आहे की मेली?, मोदींचा इंडी आघाडीवर निशाणा!
एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानापुढे झाले नतमस्तक!
‘एक रणनीतीकार म्हणून, मला आकड्यांमध्ये सांगण्याची सवय नाही. मला कधीच सवय नव्हती. गेल्या दोन वर्षांत मी आकड्यांमध्ये विश्लेषण करण्याची चूक केली आहे. एकदा बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत आणि आता २०२४मध्ये. लोकसभा निवडणुकीत तुम्ही संख्येचा मुद्दा वगळलात, तर मी जे काही बोललो ते योग्य आहे,’ असे ते म्हणाले.