मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी बेताल वक्तव्य केल्याने मराठा समाजाच्या आंदोलकांनी सोमवारी त्यांच्या घरावर दगडफेक केली व परिसरातील त्यांच्या गाड्या जाळून टाकण्यात आल्या.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याच्या परिसरात गाड्या जळत असून धुरांचे लोट पाहायला मिळत आहेत.मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सोळंके यांनी टिप्पणी केल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
एका मराठा आंदोलकानं अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरू केली. या ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना आमदार प्रकाश सोळंकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं.ऑडिओ क्लिपनुसार सोळंके म्हणाले, मराठा आरक्षण हा एक पोरखेळ चालू आहे.
जरांगे पाटलांचा उल्लेख करत म्हणाले, ग्रामपंचायतीची निवडणुकाही कधी न लढवलेली व्यक्ती आज हुशार झाली आहे,असे ते म्हणाले.तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरी याचा फायदा फक्त दोन-चार टक्के लोकांना होईल, संपूर्ण समजला होणार नसल्याचे ते म्हणाले.सोळंके यांची ही क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर मराठा समाजाच्या लोकांकडून त्याच्या घरावर दगडफेक करण्यात आली व परिसरातील गाड्या जाळण्यात आल्या.
हे ही वाचा:
केरळमधील बॉम्बस्फोटमालिकेचा २० सदस्य करणार तपास
आमदार अपात्रतेप्रकरणी दोन महिन्यांत निकाल द्या!
नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न!
गुगल मॅपकडून ‘भारत’ आणि ‘इंडिया’ दोन्ही शब्दांना ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून मान्यता
दरम्यान, या घटनेबाबत सोळंके यांनी सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी घरातच होतो.”सुदैवाने, माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य किंवा कर्मचारी जखमी झाले नाहीत.आम्ही सर्व सुरक्षित आहोत, परंतु आगीमुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे ते म्हणाले.