माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनाच लाल चौकात जाण्याची भीती वाटत असे!

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे वक्तव्य

माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनाच लाल चौकात जाण्याची भीती वाटत असे!

“केंद्रीय गृहमंत्री असताना जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौकात जायला मला भीती वाटत होती,” असं वक्तव्य काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला असला तरी यावरून भाजपा नेत्यांनी देशासमोर सत्य परिस्थिती मांडली आहे. काँग्रेसची सत्ता असताना जम्मू काश्मीरमधील परिस्थिती कशी होती आणि आता कलम ३७० हातावाल्यानंतर कशी आहे याची वस्तीस्थिती समोर आणली आहे.

माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी जम्मू-काश्मीर मुद्द्यावर भाष्य केले आहे यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीत ‘Five Decades of Politics’ या स्मृतीग्रंथाच्या लॉन्चिंगवेळी सुशीलकुमार शिंदे यांनी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्याची आठवण सांगितली. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, “मी गृहमंत्री होण्यापूर्वी शिक्षणतज्ज्ञ विजय धर यांना भेटायला गेलो होतो. मी त्यांना सल्ला विचारायचो. त्यांनी मला सल्ला दिला. इकडे तिकडे फिरू नका, तर लाल चौकात जा, लोकांना भेटा आणि दल सरोवराभोवती फिरायला जा. या सल्ल्याने मला प्रसिद्धी मिळाली आणि लोकांना वाटले की इथे एक गृहमंत्री आहे, जो बिनधास्त जातो, पण कुणाला सांगू, माझी काय अवस्था होती?” असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं.

हे ही वाचा : 

अजित पवार म्हणतात, अमित शहांसमोर मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला नाही

राहुल गांधींकडून देशाची प्रतिमा मलीन करण्याचे काम !

आंदोलन सोडा, दुर्गापूजेकडे लक्ष द्या…ममतांच्या वक्तव्यामुळे पीडितेच्या आईकडून संताप

७० किलो वजनाचे सिमेंटचे ब्लॉक टाकून मालगाडी उलटवण्याचा कट !

सुशीलकुमार शिंदेंवर भाजपाने साधला निशाणा

यावरून आता भाजपाने सुशीलकुमार शिंदेंसह काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपा महाराष्ट्रने ट्वीट करत म्हटले आहे की, “काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतः कबुली दिली की, काँग्रेसचे आणि त्यांच्या मित्र पक्षाचे सरकार कश्मीरमध्ये असताना त्यांची तिथे जाण्याची हिंमत होत नव्हती. भारताचा मुकुटमणी म्हणून ओळखला जाणारा कश्मीर काँग्रेसनेच कायम अशांत ठेवला. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या भागाला दहशतवादाची कीडदेखील काँग्रेसमुळे लागली. कश्मीरमधील दहशतवादाची काळरात्र मोदी सरकारने संपवली आणि विकासाची, नव्या उमेदीची पहाट कश्मीर खोऱ्यात उजाडली. आजच्या कश्मीरमध्ये तरुणांना शिकण्याची रोजगाराची संधी निर्माण झाली. आयआयटी, आयआयएमसारख्या संस्था कश्मीरमध्ये उभारल्या जाऊन विद्यार्थ्यांना त्यातून शिक्षणाच्या संधी निर्माण झाल्या. कश्मीरमध्ये कनेक्टीव्हीटी वाढली असुन या खोऱ्यात लवकरच श्रीनगर ते जम्मूपर्यंत ट्रेन धावेल. ३७० सारखे कलम हटवल्यानंतर पर्यटकांचा ओढा कश्मीरमध्ये वाढला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी कश्मीरवर सर्वात जास्त अन्याय केला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कश्मीरने फक्त विकासाचा अभाव आणि दहशतवाद पहिला होता. त्यांच्याच सरकारमध्ये त्यांचे नेते कश्मीरमध्ये जाण्याची हिंमत करत नव्हते हे काँग्रेसचे दुर्दैव. मात्र, मोदी सरकारमुळे आता कश्मीरचं रूप पालटलं असून येत्या काही वर्षात कश्मीर विकासाचे नवे शिखर गाठेल,” अशी टीका भाजपाने केली आहे.

Exit mobile version