28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारणमला मोकळं करा... राज्याच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची फडणवीसांची इच्छा!

मला मोकळं करा… राज्याच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची फडणवीसांची इच्छा!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्यात महाराष्ट्रामध्ये भाजपासह महायुतीला मोठा फटका बसला. या निकालाची जबाबदारी स्वीकारून आपल्याला राज्यातील मंत्रिमंडळातून मोकळे करावे अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. मंगळवार ४ जूनला निकाल लागल्यानंतर बुधवारी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपा कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी आपली ही इच्छा पत्रकारांसमोर बोलून दाखविली. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून ते केंद्रात जाणार का, की त्यांच्यावर आणखी कोणती जबाबदारी टाकण्यात येणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

फडणवीस म्हणाले, या निवडणुकीचे नेतृत्व मी करत असल्यामुळे पक्षाला कमी जागा आणि मिळालेला पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो.परंतु, कमी पडलेली जागा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.तसेच पक्षाला माजी एक विनंती आहे की, आता मला विधानसभेकरिता पूर्णवेळ उतरायचे आहे.त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाला माझी विनंती आहे की, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं, पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या ठिकाणी मला वेळ देता येईल. यासंदर्भात आपण केंद्रातील वरिष्ठांशी बोलणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

लोकसभा निवडणुकीचा कालचा निकाल सर्वांसाठीच विशेषकरून भाजपसाठी अनपेक्षित होता.देशात आणि राज्यात ज्या प्रमाणे जागा येण्याची आशा होती तशा जागा मिळाल्या नाहीत. दरम्यान, राज्यात महायुतीला मिळालेल्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.तसेच काही ठिकाणी आम्ही स्वतः कमी पडलो, परंतु मी हरणारा नसून पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुंबईतील भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वप्रथम देशाच्या जनतेचे आभार मानतो कारण पंडित नेहरू नंतर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद पंतप्रधान मोदींना दिला.१९६२ नंतर हे पहिल्यांदा घडत आणि एनडीएच सरकार पुन्हा येतंय.विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या एकट्या भाजपाला मिळाल्या आहेत.भारतीय जनता पार्टी त्यांच्यापेक्षाही मोठीच राहिली.

महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही.किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा राज्यात मिळाल्या आहेत.आमची लढाई जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांशी होती तशी काही प्रमाणात नरेटिव्हशी लढाई करावी लागली. त्यामध्ये संविधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला होता.त्याप्रमाणे तो थांबवण्याच्या प्रयत्न करण्यात आम्ही अपयशी ठरलो.जनतेने दिलेला कौल आम्ही मानून पुढच्या तयारीकडे वाटचाल सुरु करणार आहे.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला; काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार

नितीशकुमार उलटले तरी भाजप स्थापन करू शकते एनडीए सरकार!

भाजपाच्या नेतृत्वात एनडीएच्या विजयानंतर नरेंद्र मोदींवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव

ईशान्य मुंबईत मिहीर कोटेचांचा पराभव बांगलादेशींमुळे

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला एकूण ४३.९१ टक्के इतके मतदान झाले आणि महायुती ४३.६० टक्के, म्हणजे अर्ध्या टक्क्यांपेक्षा कमी फरक आहे.मतदानाचा विचार केला तर महाविकास आघाडीला २ कोटी ५० लाख मते मिळाले.महायुतीला २ कोटी ४८ लाख मते मिळाली.म्हणजे महाविकास आघाडीला २ लाख मते जास्त मिळाले आहेत.

मुंबईमध्ये महाविकास आघाडीला ४ जागा आणि महायुतीला २ जागा मिळाल्या आहेत.महाविकास आघाडीला २४ लाख ६२ हजार मते आहेत.तर महायुतीला २६ लाख ६७ हजार मते आहेत.म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला २ लाख मते जास्त मिळाली आहेत.२०१९ चा विचार केला तर दीड टक्क्यांनी आमची मते कमी झाली आहेत.त्यामुळे भाजपला एनडीएला महाराष्ट्राने नाकारले असा अर्थ होत नाही.समसमान मते दिली आहेत परंतु २०१९ च्या तुलनेने कमी मते मिळाली आहेत.काही मुद्यांमुळे आम्ही मागे पडलो, त्याचे आम्ही आकलन करू.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा