31 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरराजकारण'मला तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिलेली नाही'

‘मला तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिलेली नाही’

Google News Follow

Related

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषणाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. त्या आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी पाठविले होते.

गावे आदर्श करण्याऐवजी सरकार वाईन घरोघरी पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. लोकायुक्तासारखा कायदा होत नाही. शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही. आता आणखी काही वाईट पाहण्याची इच्छा उरलेली नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

उद्यापासून हजारे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्याआधी त्यांनी सरकारला एक निरोप द्यायला सांगितला आहे. ते म्हणाले, ” तुमच्या राज्यात मला जगण्याची इच्छा उरलेली नाही, लोकशाही असताना हे सर्व मला पाहायचे नाही, हा माझा निरोप सरकारला द्या” असे हजारे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, मंत्री मंडळाने किराणा दुकानात वाईन विक्रीला ठेवण्याच्या निर्णयामुळे लहान मुलांना व्यसन लागू शकते, यामुळे येणारी पिढी बरबाद होईल. राज्यात अनेक बियर बार आहेत, वाईनची दुकाने आहेत मग आणखी किराणा दुकानात का ठेवायचे? व्यसनाने लोक बरबाद झाले आहेत, युवा पिढी व्यसनाच्या अधीन गेले तर काय होणार? असे प्रश्न हजारे यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा

जयप्रभा स्टुडिओमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यावरून वाद

Tata IPL 2022 Mega Auction: लिलावाच्या दुसऱ्या दिवशी काय होणार?

शेट्टी बहिणींना आणि त्यांच्या आईला न्यायालयाचे समन्स

दरम्यान, उपोषणप्रकरणी राज्य उत्पादनशुल्क विभागाचे सहआयुक्त यतीन सावंत व उपआयुक्त सुनील चव्हाण यांनी हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी  हजारे यांना, ” उपोषण करू नये, तुमचे काय म्हणणे आहे ते सांगा. या कायद्यात काही दुरुस्त्या हव्या असतील तर त्याही सांगा. आम्ही तसा बदल करू शकतो. मात्र, आपण उपोषण करू नये,” अशी विनंती त्यांनी केली आहे.

त्या वेळी हजारे यांनी, सरकार नको त्या गोष्टींकडे लक्ष देत आहे. दारूविक्रीतून महसूल वाढावा म्हणून दारूच्या किमती कमी केल्या आहेत. माझे जीवन मी देशसेवा व समाजसेवेसाठी अर्पण केलेले आहे. मी समाजासाठी जगलो आहे, त्यामुळे उपोषणावर मी ठाम आहे, असे त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा