गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितली नरेंद्र मोदींची खासियत
“माझ्या दशकांच्या दीर्घ सहवासात मी मोदीजींसारखा समोरच्याचं सगळं ऐकून घेणारा नेता पाहिला नाही, अशा शब्दांत गृहमंत्री अमित शहा यांनी नरेंद्र मोदीची खासियत सांगितली. नरेंद्र मोदी हे हुकूमशाह असल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जातो. पण तो आरोप निराधार असल्याचे अमित शहा म्हणतात.
“जे लोक आमच्यावर आरोप करत आहेत, ते निराधार आरोप करत आहेत. मी मोदीजींसारखा समोरच्याचे सगळे ऐकून घेणारा नेता पाहिला नाही. जर कोणत्याही समस्येसंदर्भात बैठक असेल तर मोदीजी कमी बोलतात पण सर्वांचे नीट ऐकतात, त्यानंतरच निर्णय घेतात. अनेकदा आम्हाला असं वाटतं की, ‘यामध्ये इतका विचार करण्यासारखं काय आहे? पण प्रत्येक व्यक्तीच्या गुणवत्तेच्या आधारावर केलेल्या सूचनेला मोदीजींनी महत्त्व दिले आहे. ते कधीही ती व्यक्ती कोण आहे, यापेक्षा त्या व्यक्तीने कोणता मुद्दा उपस्थित केला आहे, त्यानुसार त्याला महत्त्व देतात. सर्वांना सामान न्याय देतात. म्हणून, पंतप्रधान म्हणून ते आपले निर्णय लादतात असे म्हणणे अजिबात खरे नाही. ज्याने त्यांच्याबरोबर काम केले आहे, असे टीकाकारही सहमत असतील की यापूर्वी मंत्रिमंडळात कधीही अशा पद्धतीने काम केले गेले नाही.” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
आरे वसाहतीत आता बिबट्यांपायी दुचाकीवरून फिरणेही मुश्कील
नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज
आशिष मिश्रा एसआयटीसमोर; आता वास्तव येईल समोर
संजय राऊत…काश्मीरात भाजपाने हे केले!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघेही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून एकत्र काम करत आहेत. पंतप्रधानांचे सर्वात जवळचे विश्वासू आणि रणनीतिकार समजले जाणारे, अमित शहा यांनी गुजरात सरकारमध्ये अनेक खाती सांभाळली होती. तेंव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.
तथाकथित शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी पीएम मोदींचा बचाव केला, ते म्हणाले की गेल्या वर्षी लागू केलेल्या कृषी कायद्यांविषयी आंदोलकांच्या चिंता निराधार आहेत. भाजपा सरकारने उत्पादकांना मदत करण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत.