भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्यांवर हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यावेळी पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. त्यानंतर खोटा एफआयआर दाखल करण्यात आला. त्यामुळे प्रवीण दरेकर, किरीट सोमय्यांसह शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे. यावेळी सोमय्यांनी बोगस एफआयआर रद्द करून त्यांच्या एफआयआर नोंद करण्याची मागणी केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य तो निर्णय घेतील असे सांगितले आहे.
राज्यपालांसोबतच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी माध्यमांशी संपर्क साधला आहे. त्यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, सरकारच्या माध्यमातून मुंबई पोलिसांवर दबाव आणून पोलिसांच्या मार्फत जे घडवलं जात आहे, ते सर्व राज्यपालांच्या कानावर घातले आहे. सोमय्यांवरील हल्ल्याचा सर्व घटनाक्रम राज्यपालांच्या कानावर घातला असल्याचे दरेकर म्हणाले. पुढे ते म्हणाले, हल्ला झाला सोमय्यांवर आणि त्याचा एफआयआर सोमय्यांच्या चालकावर दाखल करण्यात आला. त्यानंतर अनेक प्रयत्न करून शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर नावाला गुन्हा दाखल करण्यात आला. लगेच त्यांना जामीन देखील मिळाला. या प्रकरणात पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे.
झेड सुरक्षा नेत्यावर हल्ला होतो मग सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल दरेकरांनी केला आहे. या सर्व गोष्टी लोकशाहीला घटक आहेत. ठाकरे सरकार न्याय देईल असे वाटतं नाही म्हणून, गृहमंत्र्यांकडे न जाता आम्ही राज्यपालांकडे गेलो असे दरेकर म्हणाले.
हे ही वाचा:
एबीजी शिपयार्ड कंपनीच्या २६ कार्यालयांवर ईडीने टाकल्या धाडी
किरीट सोमय्यांच्या जखमेचा अहवाल समोर
वकील गुणरत्न सदावर्तेंना जामिन! अटकेपासूनही संरक्षण
हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा
तसेच किरीट सोमय्यांनीदेखील माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, बोगस एफआयआर रद्द करून माझा एफआयआर घेण्याची मागणी राज्यपालांकडे केल्याचे सोमय्या म्हणाले. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देखील मुख्यमंत्र्यांनी निलंबित करावे अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. यावर राज्यपालांनी या प्रकरणाचा निश्चित तपास करणार असल्याचे म्हटले आहे.