ओडिशातील पराभवानंतर व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा!

नवीन पटनायक यांचे मानले जातात निकटवर्तीय

ओडिशातील पराभवानंतर व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा!

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय बीजेडी नेते व्हीके पांडियन यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.लोकसभेत बीजेडीच्या दारुण पराभवानंतर व्हीके पांडियन यांनी सक्रिय राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे.एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली.

राजकारण सोडण्याबाबत बोलताना व्हीके पांडियन व्हिडिओमध्ये म्हणाले की, माझ्या राजकारणातील प्रवेशाचा एकमेव उद्देश नवीन पटनायक यांना पाठिंबा देणे हा होता.त्यामुळे मी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवासात माझ्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. यासोबतच मी या निवडणूक प्रचारात दिलेल्या कथनामुळे बीजेडीचे काही नुकसान झाले असेल किंवा पक्षाचा पराभव झाला असेल तर त्याबद्दल मी सर्व पक्ष कार्यकर्त्यांसह संपूर्ण बिजू परिवाराची माफी मागतो.दरम्यान, तामिळनाडूमध्ये जन्मलेले व्हीके पांडियन हे ओडिशा केडरचे २००० बॅचचे आयएएस अधिकारी होते.नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय म्हणून व्हीके पांडियन यांची ओळख आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला राहणार उपस्थित

जम्मूच्या ज्वेलर्सने नरेंद्र मोदींसाठी बनवले चांदीचे कमळ!

काँग्रेसची ‘खटाखट योजना’ म्हणजे मतदारांना लाच देणे; ९९ खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी

बेपत्ता इंडोनेशियन महिला मृतावस्थेत आढळली अजगरच्या पोटात!

दरम्यान, यावेळेस ओडिशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या.अगोदर लोकसभा निवडणुकीबद्दल बोलू. ओडिशामध्ये लोकसभेच्या २१ जागा आहेत. भाजपने अनपेक्षित यश मिळवत २० जागा जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले. नवीन पटनायक यांच्या पक्षाला केवळ १ जागा मिळाली. विधानसभा निवडणुकीतही भाजपने अप्रतिम कामगिरी केली. ओडिशामध्ये विधानसभेच्या एकूण १४७ जागा आहेत. यापैकी ७८ जागा भाजपने जिंकल्या आहेत.बीजेडीला ५१ जागा मिळाल्या.तर काँग्रेसने विधानसभेच्या १४ जागा जिंकल्या.भाजपने विधानसभेत घवघवीत यश मिळवत नवीन पटनायक यांची ओडिशातील २४ वर्षांची सत्ता संपवून टाकली.दरम्यान, लोकसभेत बीजेडीच्या दारुण पराभवानंतर व्हीके पांडियन यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे.

Exit mobile version