पॅकेजच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी वाजवली जुनीच टेप! म्हणाले…

पॅकेजच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी वाजवली जुनीच टेप! म्हणाले…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कुठलीही ठोस मदत जाहीर करायचं सोडून मुख्यमंत्री हे डायलॉगबाजी करतानाच दिसले. मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणार मुख्यमंत्री आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरला भेट दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रावर कोसळलेले आस्मानी संकट भयानक स्वरूपाचे आहे असे ते म्हणाले. या संकटातून बाहेर पडताना सरकारचे प्राधान्य हे पुराच्या पाण्यामुळे होऊ शकणारी रोगराई रोखण्यासाठी आवश्यक ती साफसफाई करणे, नागरिकांना दिलासा देणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे याला आहे.

हे ही वाचा:

मुंबई भाजपातर्फे कोल्हापुरातील पुरग्रस्तांना मदत

ठाकरे सरकार म्हणजे दर चार दिवसांनी नवी पुडी सोडून वेळ मारून न्यायची

अनिल देशमुख यांची अटक निश्चित

वीजबिल माफीवर सवाल केला आणि साहेबांचा मूड गेला

हे संकट नेहमीचेच झाले आहे आणि त्यात संसार वाहून जात आहेत. त्यामुळे यावर कायम स्वरूपाचा तोडगा काढला जावा अशी नागरिकांची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. नद्या फुगल्यामुळे येणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या नियोजनाचा आराखडा तयार केला जाणार आहे. तर कोसळणार्‍या दरडी, खचणारे रस्ते लक्षात घेता त्याबाबतही काही उपाययोजना केल्या जाणार आहेत. पुरबाधित क्षेत्रातील आणि दरड कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचे चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर सरकारचा भर आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

याचवेळी पत्रकारांनी पॅकेजबद्दल विचारले असता, मी पॅकेज जाहीर करणारा नाही तर काम करणारा मुख्यमंत्री आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपली जुनीच टेप पुन्हा वाजवली. या आधीही ‘माझा पॅकेजवर विश्वास नाही’ असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी आज केला. त्यामुळे पाहणी करून गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी कुठलीही आर्थिक मदत जाहीर न करता पूरग्रस्त भागातील नागरिकांची निराशा केली आहे.

Exit mobile version