बला टळणार नाही…मी कुठेही जात नाहीये

बला टळणार नाही…मी कुठेही जात नाहीये

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १ जुलै रोजी माध्यमांशी संवाद साधताना चांगलीच टोलेबाजी केली आहे. फडणवीस यांच्या केंद्रात जाण्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता आपण कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले तर याचवेळी त्यांनी आपल्या विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. मी जावे असे काहींना वाटत असेल…बला टळेल अशी त्यांची भावना असेल, पण ही बला टळणार नाही. मी कुठेही जात नाहीये असे फडणवीस म्हणाले.

येणाऱ्या आठवड्यात ५ आणि ६ जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन होऊ घातलेले आहे. तर या अधिवेशनाच्या अनुषंगाने राज्यात सध्या विधानसभेच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीचा विषय हा पुन्हा एकदा चर्चेला आहे. गुरुवारी या बाबतीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता, अजून निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होईल तेव्हा भाजपा आपली स्ट्रॅटेजी जाहीर करेल असे फडणवीसांनी सांगितले.

हे ही वाचा:

पाच लाख लशींच्या कुप्या गायब झाल्या तरी कुठे?

आता बस झाले! दुकानांची वेळ वाढवा!!

दहा हजार गुंड आणण्याचे आदेश मातोश्रीवरून?

भारत सरकारतर्फे पीक विमा सप्ताहाचा शुभारंभ

त्याच वेळी फडणवीस यांनी दिल्लीत मंत्रिपद देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. माझ्या शुभचिंतकांना वाटते की मी दिल्लीत जावे पण त्यांना मी नम्रपणे सांगतो की मी कुठेही जाण्याची शक्यता नाही. तर काहींना वाटेत मी जावे. बला टळेल. पण बला टळणार नाहीये. असे फडणवीस म्हणाले. तर ज्या लोकांना महाराष्ट्राचे आणि भाजपाचे राजकारण कळते त्यांच्या लक्षात येईल की मी जाण्याची कोणतीही शक्यता नाही.

ज्यांना वाटते आपण सरकार चालवतो, त्यांना समाधान घेऊद्या
संजय राऊत हे मविआ सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांनी बैठका घेतल्याच्या वृत्ताबाबत फडणवीस यांना विचारले असता. सरकार कोण कोण वाचवताय? आणि सरकार धोक्यात आहे असे त्यांना वाटते का ? याची मला कल्पना नाही. तर महाविकास आघाडीच्या अशा बैठका रोज होत असतात असे फडणवीस म्हणाले. तर काहींना वाटते की आम्हीच सरकार बनवतो. आम्हीच बिघडवतो. आम्हीच सरकार चालवतो. तर त्यांना त्याचे समाधान घेऊद्या असा सणसणीत टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

तर नाना पटोले यांनी नितीन राऊत यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत विचारले असता पटोलेंना ऊर्जा मंत्री होण्यात रस असल्याचे फडणवीसांनी सांगितले तर नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षातील मंत्र्याच्या खात्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणे गंभीर आहे. याची चौकशी झालीपाहिजे असे फडणवीस म्हणाले.

 

Exit mobile version