मी घटनेनुसारच काम करतोय

मी घटनेनुसारच काम करतोय

राज्यपालांच्या मराठवाडा दौऱ्यावरून राजकारण पेटलेलं असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे. मी संविधानाने दिलेल्या घटनेनुसारच काम करतोय आणि कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याआधी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून थेट राज्यपालांवर टीका केली होती. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांवर आक्षेप घेतला होता. याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील राज्यपालांवर टीका केली होती. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यात भाजपा राज्यपालांकडून सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला होता.  त्यावर आता राज्यपालांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यपाल सध्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बैठक नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली, असं राज्यपाल म्हणालेत. मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचं काम करतोय, असं राज्यपालांनी स्पष्ट केलं. जेवढी मदत करता येईल तेवढी मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित केली जाणार असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हटलंय.

हे ही वाचा:

सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत पदक

महापूराच्या नावाखाली शिवसेनेची नवी वसुली सुरु

…तर मुख्यमंत्री उद्या कदाचित गेट वे ऑफ इंडियाचंसुद्धा लोकार्पण करतील

पोलिस कुटुंबियांना पाठवलेल्या नोटीसा रद्द करा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा नांदेड जिल्ह्याचा दौरा आज संपला आहे. नियोजित दौरा आटोपून राज्यपाल मुक्कामासाठी रवाना झाले आहेत. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात राज्यपालांचा मुक्काम असेल. उद्या सकाळी 9 वाजता ते हिंगोलीसाठी रवाना होणार आहेत.

Exit mobile version