हैदराबाद : ओवेसींविरोधात भाजप उमेदवार माधवी लता यांनी शड्डू ठोकला!

२१ लाख मतदारांच्या न्यायासाठी युद्धाला सुरुवात, माधवी लता

हैदराबाद : ओवेसींविरोधात भाजप उमेदवार माधवी लता यांनी शड्डू ठोकला!

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे.कालच भाजपने आपल्या एकूण १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. भाजपने १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यावेळी भाजपने तेलंगणातील हैदराबाद मतदारसंघावर कोम्पेला माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. सध्या या जागेवर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये माधवी लता ओवेसींवर हल्ला करताना दिसत आहे. माधवी लता म्हणाल्या की, २१ लाख मतदारांच्या न्यायासाठी युद्धाला सुरुवात झाली आहे.

मतदार संघ गरिबीने आणि शिक्षणाने मागासलेला
भारतीय जनता पक्षाने (भाजप) शनिवारी कोम्पेला माधवी लता यांना हैदराबादमधून नवा चेहरा म्हणून रिंगणात उतरवले आहे.यावर त्यांनी एक मुलाखत दिली आणि आपल्याला मिळालेल्या मतदारसंघात किती उणिवा आहेत यावर त्यांनी लक्ष केले.माधवी लता पुढे म्हणाल्या की, ‘हा मतदारसंघ इतका दुर्लक्षित आहे की, येथे गरिबी आणि शैक्षणिक मागासलेपण आहे.मतदार संघात स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य अशा सुविधा नाहीत. मदरशांमध्ये मुलांना जेवण मिळत नाहीये. मंदिरे आणि हिंदूंच्या घरांवर बेकायदेशीरपणे कब्जा केला जात आहे.तसेच मुस्लिम मुले अशिक्षित आहेत.अनेक मुले बालकामगार आहेत, असे माधवी लता म्हणाल्या.

हे ही वाचा:

टेक कंपन्यांना ‘एआय’ प्रोडक्ट लाँच करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी

आण्विक शस्त्रांचं साहित्य पाकमध्ये नेणाऱ्या चीनी जहाजाला मुंबईत रोखलं

… अन् मुकेश अंबानी यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

‘सीमा मर्यादा कराराचे चीनने पालन करणे आवश्यक’

माधवी लता पुढे म्हणाल्या की, मतदार संघातील लोकांसाठी आतापर्यंत काहीच केलेले नाही.हे जुने शहर म्हणजे डोंगर किंवा आदिवासी भाग नाही.हे हैदराबादच्या मध्यभागी आहे पण या ठिकाणी गरिबी आहे.मतदार संघात खूप काही करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.सर्वप्रथम महिला आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे, त्या पुढे म्हणाल्या.

२१ लाख मतदारांचे अश्रू
आपली उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल त्या म्हणाल्या, ‘२१ लाख मतदारांच्या अश्रूंचा आवाज दिल्लीत पोचला आहे, असे मला वाटते.या लोकांना न्याय मिळावा म्हणून आमचे मोठे बंधू तिथे बसले आहेत आणि या लोकांना न्यायदेण्यासाठी आता युद्धाला सुरुवात झाली आहे, असे माधवी लता म्हणाल्या.त्या पुढे म्हणल्या, माझ्या नावाची घोषणा करणे हा केवळ माझा विजय नसून आमच्या २१ लाख बंधू-भगिनींचा विजय आहे.

 

 

Exit mobile version