‘अपमानित’ कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

‘अपमानित’ कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात जात त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांना काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्री बनवावं. सरकार चालवण्यासंदर्भात माझ्यावर संशय निर्माण करण्यात आला आहे. माझा अपमान करण्यात आला. मी अजूनही काँग्रेस पक्षात आहे. सकाळी मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनाम्यासंदर्भात माहिती दिली होती. मला सर्व रस्ते खुले आहेत. सर्व पर्यायांवर विचार केला जाईल. समर्थकांसोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल असं, अमरिंदर सिंह यांनी म्हटलं.

पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी केली जात होती. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवण्यात आला होता. हे प्रकरण इतकं वाढलं होतं की काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला.

हे ही वाचा:

‘राजकारण संन्यासी’ बाबूल यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

टी २० वर्ल्डकपनंतर कुंबळे प्रशिक्षकपद स्वीकारणार?

अमेरिकेने मागितली ड्रोन हल्ल्याबाबत माफी

पश्चिम बंगाल पोलिसांना स्थानिकांशी गैरवर्तन महागात पडले

पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे हायकमांडने या २५ आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं होतं. या सर्व आमदारांशी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या पॅनलने चर्चा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंह रंधवा आदींचा या बंडखोरांमध्ये समावेश आहे. निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला काँग्रेसकडून आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करण्यास सुरुवात केली होती. परिणामी मुख्यमंत्री आणि या आमदारांमध्ये तणाव निर्माण झाला होता. कदाचित याच कारणामुळे अमरिंदर सिंग यांनी राजीनाम दिला आहे.

Exit mobile version