रामजन्मभूमीच्या जवळील जमीन विक्रीवरून घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या ‘आप’च्या संजय सिंह यांच्या आरोपांवरून लगेचच ‘सामना’तून तुतारी वाजवणाऱ्यांनी आधी आपलं झाकेललं वाकून पहावं… उगाचच बेलगाम आरोपांवरून लेखणी चालवण्याच्या हौसाबाईनंच यांचा वारंवार घात केलाय तरी अक्कल येत नाही.
हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांना रामजन्मभूमीवर बोलण्याचा अधिकार तरी राहिलाय काय, असं विचारलं तर यांना मिरच्या झोंबतात. प्रभू रामाची प्रतिष्ठा राखा, असा शहाणपणा शिकवण्यापेक्षा तुम्ही आधी शिवछत्रपतींची अब्रू धुळीस मिळवलीये, ती पुन्हा मिळवा. जे मतपेटीच्या राजकारणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्यांबरोबर संग करतात त्यांच्या तोंडी हिंदुत्व, प्रभू राम, तत्त्व आदी गोष्टी शोभत नाही. नाकर्तेपणाची मिसाल ठरणारं सरकार महाराष्ट्राच्या वाट्याला दिल्याबद्दल खरं तर जनता तुम्हाला कधी माफ करणार नसल्यानं आणि स्वतःच्या सरकारबदद्ल काही लिहिण्यालायक राहिलं नसल्यानंच रामजन्मभूमी वगैरे मुद्दे हाती घेऊन स्वतःची अब्रू वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय. पण यामुळे तुम्ही केलेलं लांगुलचालन झाकू शकणार नाहीये. तेव्हा, जिथे भ्रष्टाचार नाहीच, तिथे तुम्हाला तो दिसणं स्वाभाविक आहे. आणि, जिथे वसुली दिसतेय तिथे तुम्ही गप्प बसणार हेही ओघाने आलेच.
हे ही वाचा:
नागपुरमध्ये आशा वर्कर्सचे आंदोलन सुरु
फ्रंटलाइन वर्कर परिचारिका का जात आहेत आंदोलनावर?
एकनाथ शिंदेंविरोधात ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्याबद्दल अभिनेत्याला अटक
सरकारी कर्मचारी सरकारविरुद्ध आंदोलनाच्या तयारीत
खरंतर, संजय सिंहच्या आरोपानंतर लगेचच रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सविस्तर पत्रक काढून हे सर्व आरोप फेटाळले आणि सविस्तर खुलासाही केलाय. जमिनीचे भाव का वाढले, खरेदी कशी झाली आदी खुलासे केले. तसेच, उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनीही प्रथमदर्शनी यात काही गैर दिसत नसल्याचे सांगितले. तरीही, तसे आढळल्यास चौकशी करण्याचे आश्वासनही दिले. परंतु, या सर्व गोष्टींचा उल्लेखही न करता केवळ पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालकांना उपदेश करण्याचा आगाऊपणा (नेहमीसारखाच) शिवसेनेनं केलाय, यातच तुमचा अंतस्थ बदललेला हेतूही लक्षात येतो.
मुळात, हिंदूंचा विजय होऊन रामजन्मभूमी वाद मिटला, हेच अनेकांना पचनी पडलेलं नाही. त्यामुळे, राममंदिराच्या उभारणीत अशी अनेक विघ्न येणं अपेक्षितच आहे. अनेक हिंदुत्ववादीविरोधी यासाठी कंबर कसून कामाला लागलेत. पण, तुमच्यासारख्या कधीतरी हिंदुत्वाची शाल अंगावर घेणाऱ्यांनी तरी किमान जनाची नाही तर मनाची बाळगावी. येरागबाळ्यांच्या आरोपांवरून तोंड वाजवण्यापेक्षा यामागचे षडयंत्र ओळखावे, एवढीच अपेक्षा!
– मंत्रज्ञ