सराव न करताच खेळा मिनी ऑलिम्पिक!

सराव न करताच खेळा मिनी ऑलिम्पिक!

Sports, set of athletes of various sports disciplines. Isolated vector silhouettes. Run, soccer, hockey, volleyball, basketball, rugby, baseball, american football, cycling, golf

सरकारच्या अजब निर्णयाबद्दल आश्चर्य; निर्बंधांमुळे मैदाने, खेळ बंद

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या नव्या निर्बंधांमुळे क्रीडापटूंचे मात्र नुकसान होत असल्याची भावना आहे. मैदानेच खुली नसल्यामुळे खेळाडूंनी सराव कसा करायचा हा प्रश्न खेळाडू, कार्यकर्ते, क्रीडा संघटनांच्या मनात निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर १ मेपासून मिनी ऑलिम्पिक आयोजन करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली घोषणा कशी अमलात येणार असा प्रश्न क्रीडा संघटक, खेळाडू विचारू लागले आहेत. सराव करण्यासच मनाई आहे मग हे मिनी ऑलिम्पिक सरावाशिवाय खेळायचे का, असा प्रश्न खेळाडू विचारू लागले आहेत.

राज्यात ओमिक्रॉनमुळे नवे निर्बंध घातले गेले आहेत त्यात मैदानावर खेळण्यास मनाई आहे, असे स्पष्टपणे म्हटलेले नसले तरी मैदानावर खेळण्यास परवानगी आहे, असेही म्हटलेले नाही. त्यामुळे मैदाने बंदच आहेत. यासंदर्भात कुणीही ठोस निर्णय घ्यायला तयार नाही. मैदानावर खेळाडू खेळताना दिसले की त्यांना अडवले जात आहे. सरावच केला जात नसेल तर खेळाडूंची तयारी कशी होणार? आगामी काळात स्पर्धा असतील तर खेळाडूंनी सरावाशिवाय स्पर्धांना कसे सामोरे जायचे? असे प्रश्न खेळाडूंना सतावत आहेत. खेळाडू व क्रीडाक्षेत्राची ही बाजू प्रशासन, मंत्री यांच्यासमोर कोण मांडणार, हा गंभीर विषय कोण समजावून सांगणार हाही प्रश्न आहे.

येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मिनी ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पण या स्पर्धेत खेळायचे तर सराव हवा. आता जानेवारीच्या अखेरपर्यंत निर्बंध कायम असणार आहेत. त्यानंतर निर्बंधांचे काय होईल, हे स्पष्ट नसल्यामुळे सरावावर अनिश्चिततेचे सावट आहे.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्रीजी, आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतो, तुम्ही शाळा सुरू करा’

…आणि काडीपेटीची झाली साडीपेटी!

राज्यावर घोंगावतय ड्रोन हल्ल्याचे संकट  

अभिनेता सिद्धार्थने सायनापुढे मान्य केला पराभव

 

ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदके मिळविण्यासाठी राज्य ऑलिम्पिक संघटनेने काम केले पाहिजे असे सांगतानाच २०२४, २०२८, २०३२ च्या ऑलिम्पिकसाठी सर्व क्रीडा संघटनांनी ऑलिम्पिक व्हीजन डॉक्युमेंट राज्याच्या क्रीडा विभागाकडे सादर करावे, असेही अजित पवार म्हणाले आहेत. कोरोना महामारीमुळे खेळाडूंनी खचून जाऊ नये, खेळाडूंचे मनोबल कमी होऊ नये यासाठी क्रीडा संघटनांनी काम करावे असा सल्लाही त्यांनी दिला. एकीकडे अजित पवार हे खेळाडूंना दिलासा देत असले तरी मैदाने खेळाडूंसाठी बंद असल्यामुळे खेळाडू संभ्रमात आहेत.

खाशाबा जाधव यांच्या जयंतीदिनी ‘क्रीडादिन’

भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक जिंकून देणारे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांची जयंती हा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणाही अजित पवार यांनी यावेळी केली. १५ जानेवारी हा दिवस क्रीडा दिन असेल आणि राज्यात हा दिवस ऑनलाइन क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाईल.

 

Exit mobile version