एकीकडे परप्रांतियांवर आकस ठेवणारे दुसऱ्या राज्यांत मात्र देवस्थाने आणि ट्रस्टच्या पदांवर बसतात, यावरून आता राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून आता टीका होऊ लागली आहे.
भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून याचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टवर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन यांच्याकडे शिफारस केली होती. परप्रांतीयांवर आकस ठेवणाऱ्यांना अन्य प्रांतातील देवस्थाने आणि ट्रस्टची पदं चालतात का?
आंध्र प्रदेश सरकारने तिरुमला तिरुपती देवस्थान बोर्डाच्या समितीवर २८ जणांची नावे जाहीर केली असून त्यात मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचाही समावेश आहे. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टवर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन यांच्याकशिफारस केली होती.
परप्रांतीयांवर आकस ठेवणाऱ्यांना अन्य प्रांतातील देवस्थाने आणि ट्रस्टची पदं चालतात का? pic.twitter.com/JFO2fZBLSG— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 16, 2021
सोमवार, १३ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साकीनाका बलात्कार प्रकरणात बोलताना बाहेरील राज्यातून येणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवण्याविषयी भाष्य केले. हे नागरिक कुठून येतात आणि कुठे जातात याची नोंद केली जावी असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यातून अशी प्रतिमा तयार झाली आहे की परराज्यातून नागरिक महाराष्ट्रात येतात आणि असले घृणास्पद गुन्हे करतात. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून महाराष्ट्रात खळबळ उडाली. भाजपाने त्यावर सडकून टीका केली.