लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर येणाऱ्या चौथ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रचार सभेला सुरुवात झाली आहे.दरम्यान, तेलंगणामध्ये पोहचलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.सभेला संबोधित करताना मंत्री शहा म्हणाले की, २०२४ ची निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी आहे, ही निवडणूक जिहाद विरुद्ध विकास अशी आहे.
तेलंगणातील भोंगीर येथे झालेल्या जाहीर सभेतील भाषणात महाराणा प्रताप यांची आठवण करून देत अमित शहा म्हणाले की, मुघलांविरुद्ध लढणाऱ्या महाराणा प्रताप यांचा आज जन्मदिवस आहे, माझे त्यांना नमन.ते पुढे म्हणाले, ही निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी आहे, ही निवडणूक जिहाद विरुद्ध विकास अशी आहे.ही निवडणूक राहुल गांधी यांच्या चायनीज गॅरंटी विरुद्ध नरेंद्र मोदींची भारतीय गॅरंटी अशी आहे.
हे ही वाचा:
अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात ‘कौन घुसा’…बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा!
युक्रेन आता कैद्यांना भरती करणार सैन्य दलात
“खासदारकी पुन्हा मिळवण्यासाठी दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?”
उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद? अल्पवयीन मुलीला धावत्या रेल्वेखाली फेकले
अमित शहा म्हणाले की, निवडणुकीचे तीन टप्पे झाले आहेत आणि आम्ही २०० च्या जवळ पोहोचलो आहोत.तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर हल्ला करताना ते म्हणाले, “रेवंत रेड्डी ऐका, यावेळी तेलंगणात आम्ही १० पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत आणि आम्ही ४०० पार करणार आहोत.