२०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा विचार चालू होता.मात्र, अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केला होता.तसेच भाजपने देखील मुख्यंमत्री पदासाठी शिंदे यांच्या नावाचा विरोध केला होता, असा दावा उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.या दाव्यावरून पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा विरोध करून ठाकरेंना ब्लॅकमेल करून मुख्यमंत्री पदासाठी स्वतःच्या नावाचा उल्लेख केल्याचा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावासाठी संजय राऊत यांचा सर्वात मोठा विरोध होता.ज्याला कुठला अनुभव नाही, ज्याला पक्ष चालवता येत नाही, त्याला तुम्ही मुख्यमंत्री कसे करता?, असा प्रश्न संजय राऊत यांनी शरद पवारांना विचारला न्हवता का?. ते पुढे म्हणाले की, संजय राऊत यांनी स्वतः मातोश्री बंगल्यावर जाऊन उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करण्याचे काम केलं.तुम्ही जर मला मुख्यमंत्री नाही केलं तर मी मातोश्रीच्या आतील बातम्या बाहेर सांगेन.तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती कशी हडप केली याचे कागदपत्रे बाहेर देईन, अशी ब्लॅकमेलची धमकी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना दिली न्हवती का?.मुख्यमंत्री म्हणून स्वतःच्या नावाचा आग्रह शरद पवारांकडे संजय राऊत यांनी धरला न्हवता का?, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा:
मुंबईतील डॉ.निलेश दोशी अमेरिकेतील चार हजार डॉक्टरांना करणार संबोधित!
धोनीच्या षटकाराने चेन्नई पराभूत!
तृणमूलनेता पोलिसांच्या ताब्यात; आठवीच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा आरोप
अफगाणिस्तानमध्ये भीषण पाऊस, पुरात ६८ जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री पदासाठी संजय राऊत यांचे नाव सुचवण्यासाठी सामनाच्या कार्यालयामधून किती आमदारांचे फोन गेले होते.कुठल्या ब्लॅकमेलचे आणि धमकीचे धंदे सुरु केले होते.म्हूणन सुख्या धमक्या आणि सुखे गौप्यस्फोट करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून बनवू नका किंवा माझे स्वतःचे नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा असे कार्यक्रम संजय राऊत तुम्ही चालू केलं होते का?, याचाही गौप्यस्फोट करावा.मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नावाने कसा विरोध होता, भाजपने देखील शिंदे साहेबांच्या नावाने कसा विरोध केला होता, याबद्दलच्या खोट्या बातम्या तुम्ही नंतर पसरवा, असे आमदार नितेश राणे म्हणाले.