राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी सोमवार, १५ ऑगस्ट रोजी बस चालवली होती आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची सजवलेली एसटीची बस शहरातून स्वत: चालवली. त्याचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले. यावर भाजपाने आक्षेप घेतला असून जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यदिनी जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगारची एसटी चालवली होती. मात्र, त्यांना एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना किंवा जड वाहन चालक म्हणून आवश्यक असणाऱ्या परवाना किंवा बॅच बिल्ला नसताना जड वाहन बेकायदेशीररित्या जयंत पाटील यांनी चालवलं, असा आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
जयंत पाटील यांनी स्वतः प्रसिध्दीसाठी आणि कोणताही अनुभव नसताना बेकायदेशीरपणे एसटी चालवली त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. इस्लामपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण यांच्याकडे ही मागणी करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
रोहिंग्यांना फ्लॅट देण्याच्या निर्णयावर नरेंद्र मोदींची फुली
मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून जॅकलिन फर्नांडिसचे नाव
निवडणूक समितीतून गडकरी गेले, फडणवीस आले!
आर्थिक मंदी तीही भारतात ? अशक्य
जयंत पाटील यांनी बस चालवताना दुर्दैवाने काही घटना घडली असती, तर मोठे नुकसान झाले असते, असे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. हे लक्षात घेऊन ३/१८०, ५/१८१ या कलमातंर्गत गुन्हा दाखल करावा आणि चौकशी झाल्यावर योग्य कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.