अनिल परबचे सहाय्यक खरमाटेंकडे साडेसातशे कोटींची मालमत्ता आली कुठून?

अनिल परबचे सहाय्यक खरमाटेंकडे साडेसातशे कोटींची मालमत्ता आली कुठून?

“तासगाव सांगली, येथील बजरंग खरमाटे यांच्या फार्म हाऊसची पाहणी केली. खारमटेंच्या आणखी ४ बेनामी मिळकती सांगली येथे आहे. अनिल परबचे सहाय्यक खरमाटे यांच्याकडे सांगली, पुणे, बारामती, मुंबई येथे ४० हून अधिक अधिकृत/बेनामी मिळकत आहेत.” असं ट्विट भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केलं आहे.

परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीकडून नोटीस देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी सोमवारी बजरंग खरमाटे यांच्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव येथील वंजारवाडी भागातील फार्महाऊसची आणि अन्य ठिकाणच्या मालमत्ता पाहणी केली. त्यानंतर सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

अनिल देशमुख फरार, एक अनिल जेलच्या दारात, तर उद्धव ठाकरे यांचे दुसरे अनिल जेलमध्ये जाण्याची प्रकिया सुरू झालीय. खरमटेचा मुलगा प्रथमेशच्या नावाने अनेक व्यवसाय आहेत. आता गुरुवारी  खरमटेची  बारामती, मुळशी, पुणे शहरामधील मालमत्ताची पाहणी करणार आहे. त्यामुळे या साऱ्या मालमत्ता या  खरमटेची की अनिल परब यांच्या हे परब हे सांगावे.

हे ही वाचा:

बेळगावात कमळाला कौल; शिवसेनेचे समर्थन असलेले उमेदवार पराभूत

अभिषेक बॅनर्जी ईडी कार्यालयात

समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं

जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा

बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अनिल परब यांचे विशेष सचिव होते. त्यामुळे ४० प्रॉपर्टीची बेहिशोबी साडेसातशे कोटींची मालमत्ता आहे,ती कुठून आली? याची मागणी आपण केली आहे. तर खरमाटे यांची ही संपत्ती आहे की,अनिल परब यांचा बेनामी पैसा आहे, लवकरच समोर येईल. पण ठाकरे सरकारचा एक अनिल तुरुंगाच्या दरवाजावर आहे,तर दुसरा अनिल म्हणजे अनिल परब मुहूर्त काढत आहे,अशा शब्दात भाजपाचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे.

Exit mobile version