मुख्यमंत्री महोदय, २ मिनिटांत २ परस्पर विरोधी भूमिका कशा मांडता?

मुख्यमंत्री महोदय, २ मिनिटांत २ परस्पर विरोधी भूमिका कशा मांडता?

मुख्यमंत्री महोदय, २ मिनिटांत २ परस्पर विरोधी भूमिका कशा मांडता? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडलेल्या भूमिकेवरून दरेकरांनी टोला लगावला आहे. ट्विटरच्या माध्यमातून दरेकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवार, ११ मे रोजी मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एक पत्र लिहिले आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय राष्ट्रपती महोदयांनी घ्यावा अशी भूमिका या पत्रात मांडण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भागात सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे पत्र सुपूर्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे हे मंत्री उपस्थित होते.

हे ही वाचा:

सचिन वझेची अखेर पोलिस दलातून हकालपट्टी

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीसांचा सवाल

अनिल देशमुखांची मुलेही ईडीच्या रडारवर?

मराठा आरक्षण केंद्रावर ढकलण्याची प्रक्रिया सुरू

या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षण कायदा सर्व पक्षांच्या संमतीने पारित झाल्याचे त्यांनी म्हंटले पण नंतर हा कायदा फुलप्रूफ नव्हता असे म्हणत भाजपाला लक्ष्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावरूनच विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. “मुख्यमंत्री महोदय, २ मिनिटात २ परस्पर विरोधी भूमिका कशा हो मांडता?
एकतर मराठा आरक्षण कायदा ‘एकमताने केलेला व योग्य’ आहे,असं तरी म्हणा किंवा कायदा ‘टिकणारा नव्हता’ असं तरी म्हणा!” असे दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच “युतीत असताना एक बोलणारे शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे.” असेही ते म्हणाले.

Exit mobile version