“स्टॅम्प पेपर घोटाळे हे काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असतानाच कसे होतात?”- आशिष शेलार

“स्टॅम्प पेपर घोटाळे हे काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असतानाच कसे होतात?”- आशिष शेलार

ठाकरे सरकारच्या काळात राज्यात पुन्हा स्टॅम्प पेपर घोटाळ्यासारखाच नवा घोटाळा समोर आला आहे. नाशिकमध्ये अब्दुल करीम तेलगीच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यासारखाच आणखी एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. कोट्यवधींच्या जमिनी बनावट स्टॅम्प पेपरच्या आधारे लुबाडण्याचा आल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील देवळा तहसीलातील दुय्यम निबंधक कार्यालयात काम करणारा हा स्टॅम्प वेंडर चंद्रकांत उर्फ गोटू वाघ हा एकेकाळी सर्वसामान्य होता. आज हा कोट्याधीश झाला आहे. २००२ साली तेलगी घोटाळा झालेला होता. पाच हजार कोटीच्या या घोटाळ्याची पाळंमुळंही नाशिक आणि आसपासच्या प्रदेशातच रोवलेली होती. त्यानंतर आता जवळपास वीस वर्षांनी पुन्हा तसाच घोटाळा समोर आला आहे.

हे ही वाचा:

‘भ्रष्टाचाराचा कोविड’ ही पुस्तिका भाजपा कडून प्रकाशित

या घोटाळ्यात ५० हजारहून अधिक बनावट स्टॅम्प पेपर द्वारे जमिनी हडप केल्याची शक्यता आहे. सुमारे पाचशे ते हजार कोटींचा हा घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे. महसूल यंत्रणा आणि निबंधक कार्यालयाच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याची चर्चा आहे. या सर्व घोटाळ्यावर भाजपा आक्रमक होताना दिसत आहे. भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी, “स्टॅम्प पेपर घोटाळे हे काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असतानाच कसे होतात?” असा सवाल केला आहे.

Exit mobile version