“‘टाइम’ साप्ताहिकाच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला आदी नावे आहेत. मात्र ब्रम्हांडातील बेस्ट मुख्यमंत्र्यांचे नाव त्यात नाही. त्यामुळे टाइम सर्व्हेच्या परिपूर्णतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.” असं म्हणत भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
“‘टाइम’ साप्ताहिकाच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश नसल्यामुळे त्यांच्या ‘बेस्ट सीएम’ या प्रचाराची खिल्ली उडवली जात आहे. जगप्रसिद्ध टाईम मासिकाने दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे जाहीर केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांचा समावेश करण्यात आला आहे. टाईम मासिकाकडून २०२१ या वर्षात जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकणाऱ्या १०० प्रभावशाली व्यक्तींची यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील प्रभावशाली व्यक्तींमधील आपले स्थान कायम राखले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला शह देणाऱ्या ममता बॅनर्जी यांनीही ‘टाईम’च्या यादीत स्थान पटकावले आहे. याशिवाय, भारतात कोरोनाची पहिली लस उपलब्ध करुन देणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूमुळे प्रकाशझोतात आलेले अदार पुनावाला हेदेखील जगातील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक ठरले आहेत.
हे ही वाचा:
अनिल परब यांच्याविरुद्ध निलंबित अधिकारीच न्यायालयात
वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा टी-२० कर्णधार
२१ दिवस क्वारंटाईन करूनही चीनमध्ये कोरोना कसा?
५ जी स्पेक्ट्रममध्ये मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांच्या काळात तीन प्रमुख नेत्यांनी देशाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश होत असल्याचे टाईम मासिकात म्हटले आहे. देशाच्या राजकारणावर संपूर्णपणे अंमल प्रस्थापित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसरे नेते आहेत.