30 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरराजकारण'राजीव गांधी यांनी तेव्हा काश्मिरी हिंदूंच्या समस्येकडे दुर्लक्ष केले'

‘राजीव गांधी यांनी तेव्हा काश्मिरी हिंदूंच्या समस्येकडे दुर्लक्ष केले’

Google News Follow

Related

भाजपाचे सदस्य आणि पत्रकार एम.जे. अकबर यांनी तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडून काश्मिरी पंडितांच्या अवस्थेबद्दल आलेल्या प्रतिक्रियेचा उल्लेख करत कशापद्धतीने त्या समस्येकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले याबद्दल एका मुलाखतीत सांगितले आहे.

अकबर यांनी म्हटले आहे की, काश्मिरी पंडितांचे स्थलांतर आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या अत्याचारांबाबत आपण तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांना कळविल्यावर त्यांच्याकडून आलेले उत्तर हे राजकीय स्वरूपाचे होते.

अकबर या मुलाखतीत म्हणतात की, काश्मिरी पंडितांवर सुरू असलेल्या अत्याचारांमुळे आपण व्यथित झालो होतो. जेव्हा मी या घटना आठवतो तेव्हा सुन्न व्हायला होते. आपल्याच देशात एका वर्गाला कसे निर्वासितांचे आयुष्य जगावे लागते? हे अजिबात योग्य नाही.

राजीव गांधी यांची यासंदर्भातील भूमिका काय होती, हे सांगताना अकबर म्हणतात की, मी तत्कालिन पंतप्रधान व केंद्र सरकारकडे हा प्रश्न उपस्थित केला. पण त्यावर राजीव गांधी यांचे उत्तर राजकीय स्वरूपाचे होते. राजीव गांधी म्हणाले होते की, काश्मिरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचे सरकार आहे. त्यात मी कसा काय हस्तक्षेप करू शकतो? राजीव गांधी आणि फारुख अब्दुल्ला हे मित्र होते.

तत्कालिन सरकारने कशी निष्क्रियता दाखविली त्याबद्दल अकबर म्हणतात की, सरकारची ती खरी जबाबदारी होती. अशा घटना काश्मिरात घडत असताना सरकारने डोळे मिटून गप्प बसणे योग्य नव्हते.

हे ही वाचा:

‘शिवसेनाप्रमुखांची नव्हे सोनिया मॅडम आणि जाणत्या पवारांच्या रिमोटवर चालणारी शिवसेना’

काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच आयोजित केला ‘द काश्मीर फाइल्स’चा शो

टायगर मेमनच्या भावाचा पार्टनर, सध्या आहे फराज नवाब मलिकचा पार्टनर

राणे पिता पुत्रांना अटकपूर्व जामीन मंजूर

 

द काश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशभरात या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. थिएटर्समध्ये मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांत या चित्रपटाने ६० कोटींचा धंदा केला आहे. पण हिंदू काश्मिरींच्या हत्याकांडाला वाचा फोडल्याबद्दल काही मंडळींच्या पोटात दुखू लागले आहे. त्यातून मग वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत हा चित्रपट कसा अयोग्य आहे, हे दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न होतो आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा