ठाकरे सरकारमध्ये इतका निबरपणा येतो कुठून?

ठाकरे सरकारमध्ये इतका निबरपणा येतो कुठून?

गेली दोन वर्षे सलग कोकण किनारपट्टीला वादळाचा फटका पडला आहे. गेल्यावर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीचे नुकसान केले होते. ठाकरे सरकारकडून त्या वादळाची नुकसान भरपाई अनेकांना आजतागायत मिळाली नाही. तरीही सरकारने तौक्तेची मदन जाहीर करून टाकली आहे. यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

मागील वर्षी निसर्ग या चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला झोडपले होते. त्यामध्ये अनेकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. मात्र ठाकरे सरकारने यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवली नाही. लक्षावधींचे, कोट्यवधींने नुकसान झालेल्यांना काही हजारांची मदत देऊन ठाकरे सरकारने त्यांची क्रुर थट्टाच केली होती. कित्येकांना तर आजतागायत ही मदत मिळाली देखील नाही. असे असताना आता पुन्हा एकदा तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या कोकण किनारपट्टीसाठी ठाकरे सरकारने मदत देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आधीच्या वेळचा अनुभव ताजा असताना आता ठाकरे सरकारने नुकसानभरपाईची गाजावाजा करत घोषणा केली आहे. यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हे ही वाचा:

इंडियन व्हेरिअंट नावावरून केंद्र सरकारने समाजमाध्यमांना झापले

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दिलासा

चक्रीवादळापेक्षा जास्त वेगाने मुख्यमंत्र्यांचा दौरा

२०२१ च्या अखेरपर्यंत सर्व प्रौढांचे लसीकरण करणार

त्यांनी ट्वीटरवरून सरकारवर टीका करताना, इतका निबरपणा येतो कुठून असा सवाल केला आहे. सरकारने गाजावाजा करत नुकसानभरपाईची घोषणा केल्यावरून त्यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणतात,

गेल्या वर्षीच्या निसर्ग वादळातील नुकसान झालेल्या लोकांना सरकारी प्रक्रिया पूर्ण करूनही आज तागायत मदतीचा एक छदामही मिळालेला नाही. तरीही शुक्रवारी मुख्यमंत्री तोक्ते वादळाच्या नुकसानभरपाईची गाजावाजा करत घोषणा करून आले. इतका निबरपणा कुठून येतो यांच्यात?

Exit mobile version