ठाकरे सरकारने कोरोनाच्या होणाऱ्या चाचण्या कमी करून राज्यातील रुग्णवाढ कमी दाखवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. त्यावरून भाजपाने आधीच सरकारला लक्ष्य केले होते. मात्र आता रुग्णसंख्या कमी झाली की श्रेय सरकारला आणि वाढली की दोष जनतेला अशी दुटप्पी भूमिका कशी घेतली जाऊ शकते असा सवाल करत मनसेचे संदिप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आहे.
हे ही वाचा:
सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट
माजी खासदार पप्पू यादव यांना अटक
ठाकरे सरकारने अर्णब, कंगनाशी लढण्यात घालवली दीड वर्ष
तुमच्या मुलांना शाखेत पाठवा, देश वाचवा
राज्यात रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात??? अशा थेट सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला. यासंबंधी त्यांनी एक ट्वीटही केलं. या ट्वीटमध्ये ते म्हणतात,
आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल,मुख्यमंत्री पालकमंत्री सगळेच घेत आहेत .म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात???

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 11, 2021
राज्यात गेल्या २४ तासांत ३७ हजार ३२६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून गेल्या काही आठवड्यांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. विशेष म्हणजे ६१ हजार ६०७ इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आज करोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे.