29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारण...म्हणून काँग्रेसने जाहीरनाम्यात केला बजरंग दलाचा समावेश

…म्हणून काँग्रेसने जाहीरनाम्यात केला बजरंग दलाचा समावेश

या पार्श्वभूमीवर हिंदू आणि मुस्लिमांची मते मिळावीत, यासाठी या दोन गटांची नावे घेण्यात आल्याचे अनेकांचे मत आहे.

Google News Follow

Related

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि बजरंग दल यांसारख्या संघटना जातीय सलोखा बिघडवणाऱ्या आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन काँग्रेसने गेल्या मंगळवारी कर्नाटकच्या जाहीरनाम्यात दिले आहे. त्यामुळे एकच गदारोळ उडाला. भाजपनेही काँग्रेसला यावरून लक्ष्य केले. तेव्हा हा मुद्दा जाहीरनाम्यात अचानक कसा आला, याचा शोध घेण्यात आला.

जाहीरनामा तयार केला जात असताना जाहीरनाम्याच्या कायदा आणि न्याय प्रकरणात, समाजात द्वेष पसरवणाऱ्या गटांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे वचन देण्याची कल्पना पुढे आली. परंतु त्यामध्ये कोणाचेही नाव न घेण्याचे ठरले होते. मात्र नंतर जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीने समतोल राखण्यासाठी पीएफआय आणि बजरंग दल अशी नावे टाकावीत, ही नेत्यांची विनंती मान्य करण्यात आली आणि अशा तऱ्हेने बजरंग दल व पीएफआयने काँग्रेसच्या जाहीरनाम्यात प्रवेश केला, असे सूत्रांनी सांगितले.

 

१० मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू आणि मुस्लिमांची मते मिळावीत, यासाठी या दोन गटांची नावे घेण्यात आल्याचे अनेकांचे मत आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना द्वेषयुक्त भाषणांविरुद्ध स्वत:हून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. बजरंग दल आणि पीएफआयवर बंदी घालण्याची संकल्पना यातूनच पुढे आली असावी आणि या मुद्द्याचा जाहीरनाम्यामध्ये समावेश करण्यात आला असावा, असे काही वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

‘मी पुन्हा येईन’, असं न सांगता पवार पुन्हा आले…

‘अजित पवारांचं वागण बघूनचं शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला’

बारसूत लोकभावनेबद्दल बोलणाऱ्यांनी महापौरांचा बंगला कसा ढापला?

‘द केरळ स्टोरी’ चित्रपट मध्यप्रदेशात टॅक्स फ्री; आता महाराष्ट्रातही मागणी !

काँग्रेसच्या जाहीरनाम्यानंतर उजव्या विचारसरणीचा गट आणि भाजपने हा मुद्दा उचलून धरल्यानंतर, काँग्रेसने एक सर्वेक्षण केले. त्यातून आपण जाहिरनाम्यात बजरंग दलाचे नाव टाकल्यामुळे फार काही फरक पडणार नसल्याचा निष्कर्षही काढण्यात आला. त्यानुसार, कर्नाटकातील केवळ सात टक्के मतदारांना हा मुद्दा काय आहे, याची जाणीव आहे. यापैकी १० टक्क्यांहून कमी लोकांना हा निवडणुकीचा मुद्दा वाटत होता. तसेच, यातील बहुतांश मतदार हे आधीच भाजपचे मतदार आहेत, हेदेखील या सर्वेक्षणात दिसून आले. या मुद्द्यावरून भाजपविरोधी मतदारांचे बळ अधिक आहे, हेदेखील दिसून आले. सर्वेक्षणात असे दिसून आले की, कर्नाटकमधील किनारपट्टी भागातील केवळ चार जागांवर या मुद्द्यावरून सुमारे एक हजार ते दीड हजार मतांचे नुकसान होऊ शकते, असाही निष्कर्ष काँग्रेसने काढला आहे. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी तिथल्या उमेदवारांना अधिक मेहनत करण्याची सूचना देण्यात आली आहे.

 

काँग्रेससाठी करा किंवा मरा?

आगामी कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा विजय सुनिश्चित करण्यासाठी नेहरू-गांधी कुटुंबातील तीन सदस्य पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी याही हुबळी येथे निवडणूक रॅली घेऊन राहुल आणि प्रियांका यांच्यासह प्रचारात सहभागी झाल्या. सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर सोनिया यांनी एकाही निवडणूक रॅलीला संबोधित केले नव्हते. ११ एप्रिल २०१९ रोजी, त्यांनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा