तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर प. बंगालमध्ये १० जणांना जिवंत जाळलं  

तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर प. बंगालमध्ये १० जणांना जिवंत जाळलं  

पश्चिम बंगालमधील बीरभूमी जिल्ह्यातील रामपूरहाट येथे तृणमूलच्या नेत्याच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात १० लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हिंसाचारात संतप्त जमावाने १० ते १२ घरांचे दरवाजे बंद करून त्यांना आग लावली. या आगीत १० जण जिवंत जळाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. यामध्ये १० ते १२ घरे जळाली आहेत. एकूण १० लोकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एकाच घरातून सात लोकांचे मृतदेह काढण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

‘पाटणकर यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का?’

‘राष्ट्रीय महामार्गांवर ६० किलोमीटरच्या अंतरात एकच टोल असेल’

ट्राउझरमध्ये लपवले होते ३ हजार हिरे

इम्रान खान का आहेत मोदींच्या प्रेमात?

तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते भादू शेख यांच्यावर चार मोटरसायकलस्वारांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी तोंड झाकले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. शेख यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर लगेचच त्यांना रामपूर हाट येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. विधानसभा निवडणुकीनंतरही पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळला होता.

Exit mobile version