राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. आंदोलकांनी त्यांच्या गाड्या आणि बंगल्याला आग लावली होती. तसेच त्यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेवर आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
सोळंके यांच्या घरावर हल्ला करणारे कार्यकर्ते हे मराठा समाजाचे नसून बिगर मराठे होते. ते आपल्या राजकीय विरोधकांचे कार्यकर्ते होते, असा दावा प्रकाश सोळंके यांनी केला आहे. विशेष म्हणजे या २५० ते ३०० समाजकंटकांपासून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनीच आपल्याला वाचवलं, असा गौप्यस्फोटही सोळंके यांनी केला आहे.
“माझ्या बंगल्यासमोर जो जमाव होता त्यामध्ये मराठा समाजाशिवाय इतर देखील माणसं होती. त्याचबरोबर जे अवैध धंदे करणारे आहेत, वाळू, गुटखा, हातभट्टी, धान्याचा काळाबाजार करणारे जे लोकं होते त्यांचासुद्धा समावेश त्या लोकांमध्ये होता. माझे काही राजकीय विरोधक आहेत त्यांचे कार्यकर्ते त्या जमावात दिसत होते. त्यांच्या संस्थेत काम करणारे कर्मचारी आणि शिक्षक हे सुद्धा त्या जमावात होते,” अशी माहिती प्रकाश सोळंके यांनी दिली आहे
घरावर हल्ला करण्यासाठी आलेल्या जमावाकडे शस्त्रही होती. शिवाय पेट्रोल बॉम्बही होते. पूर्वनियोजित कट करुन हे लोकं घरावर दगडफेक करत होते, असा दावा प्रकाश सोळंके यांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे २१ आरोपी भेटले आहेत. त्यापैकी ८ आरोपी हे मराठा व्यतिरिक्त आहेत,” असं प्रकाश सोळंके यांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘एकमेकांशी मोकळ्या मनाने संवाद साधून अढी दूर करा’!
२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार
कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण
हमासचे ३०० तळ आणि भुयारांचे जाळे उद्ध्वस्त; हमासचा कमांडर ठार
राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी बांधिल आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं सोळंके म्हणाले.